Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आता ५ मिनिटांत मिळणार पॅन कार्ड

Date:

नवी दिल्ली-लवकरच केवळ काही मिनिटांत तुम्हाला पॅन कार्ड मिळू शकेल. इतकेच नाही तर तुम्ही स्मार्ट फोनवरून आपला आयकरही भरू शकणार आहात. करदात्यांच्या सोयीसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) ई-केवायसी सुविधेचा वापर करत तत्काळ पॅन कार्ड देण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.
ई-केवायसीमुळे संबंधित व्यक्तीचा पत्ता, वैयक्तिक माहितीची पडताळणी केली जाते. ‘जर ई-केवायसीद्वारे सिमकार्ड मिळू शकते तर पॅनकार्डही मिळू शकते,’ असे sसूत्रांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पॅन कार्डसाठी अर्ज केल्यावर ते मिळेपर्यंत २ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागतो. नव्या प्रक्रियेत अवघ्या ५ ते ६ मिनिटांत पॅन कार्ड तयार होणार आहे. अर्थात या नव्या प्रक्रियेत पॅन क्रमांक त्वरित मिळणार असला तरी प्रत्यक्ष कार्ड नंतर देण्यात येईल. सीबीडीटी आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने यापूर्वीच करार करून नव्या कंपन्यांना चार तासात पॅन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याव्यतिरिक्त, आयकर विभाग एक अॅप विकसित करत आहे. या अॅपद्वारे ऑनलाइन टॅक्स पेमेंट करता येणार आहे. या अॅपमध्ये पॅनकार्डासाठी अर्ज करणे, आपल्या करपरताव्याची माहिती मिळवणे आदि अन्य सेवादेखील उपलब्ध असतील. कंपनी यापूर्वीच आपल्या पोर्टलद्वारे बहुतांश सेवा ऑनलाइन देते. पण तरीही ज्येष्ठ नागरिक तसेच युवा करदात्यांना ही प्रक्रिया सोपी, सुलभ व्हावी हा यामागचा उद्देष आहे. प्रक्रिया संचालनालयाच्या देखरेखीखाली सीबीडीटीमध्ये अॅप आणि पॅन या दोन्ही प्रकल्पांवर काम करत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...