Industrialist
आर्थिक स्थिरता आणि कामाच्या गुणवत्तेमुळे रोहन बिल्डर्सला सलग १४ व्या वर्षीही क्रिसिल कंपनीकडून DA2+ ही ग्रेड प्रदान
ही उल्लेखनीय कामगिरी पूर्ण करणारी रोहन बिल्डर्स कंपनी देशातील काही निवडक विकसकांपैकी एक आहे
पुणे २१ मे २०२४: रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित विकसक रोहन बिल्डर्सने...
शेतकऱ्यांना शेती उपकरणांसाठी आर्थिक योजना पुरवण्यासाठीॲक्सिस बँकेची व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडसोबत भागीदारी
मुंबई,21 मे 2024: ॲक्सिस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेली बँक असून, बँकेने व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड या भारतातील अग्रगण्य शेती उपकरणे उत्पादक कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि कृषी यांत्रिकीकरण उत्पादने खरेदी करण्यासाठी आर्थिक योजना पुरवण्यास मदत करता येतील. करारानुसार, अॅक्सिस बँक व्हीएसटीच्या संभाव्य ग्राहकांना त्याच्या संपूर्ण परिघात पसरलेल्या 5370+ शाखांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे आर्थिक योजना प्रदान करेल.
ॲक्सिस बँकेच्या फार्म मेकॅनायझेशनचे व्यवसाय प्रमुख, राजेश ढगे आणि व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सीईओ, श्री अँटोनी चेरुकारा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.यावेळी ॲक्सिस बँकेच्या भारत बँकिंगसाठी किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख, रामास्वामी गोपालकृष्णन आणि व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, व्ही टी रवींद्र यांची प्रमुख उपस्थिती होती.
अॅक्सिस बॅक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक विस्ताराचा लाभ घेऊन त्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणाशी जुळवून घेण्यासाठी क्रेडिट सुविधेपर्यंत सहज प्रवेश मिळेल. या भागीदारीमुळे कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रासमुक्त, परवडणाऱ्या आणि लवचिक पत सुविधांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांना शेती यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बँक लवचिक परतफेडीचे पर्याय, जलद मंजुरी आणि EMI पर्यायांवर विशेष फायदे देईल.
ॲक्सिस बँकेच्या भारत बँकिंग विभागाचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख, श्री मुनीष शारदा म्हणाले, “ग्रामीण समाज आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्वात योग्य आर्थिक उपाय प्रदान करून त्यांना सहभागी करून घेण्याचा आणि सक्षम करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. व्हीएसटी टिलर्स अँड ट्रॅक्टर्ससोबत भागीदारी करून, आम्ही या समुदायांना भेडसावणाऱ्या विविध आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रित शक्ती तयार केल्या आहेत, तसेच त्यांना प्रभावी शेती तंत्राचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आहे. आम्ही ग्रामीण भारतातील असंख्य भागीदार आणि पायोनियर्ससोबत आमची युती मजबूत करत असताना, देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याचा आम्हाला विश्वास आहे.”
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सीईओ श्री, अँटोनी चेरुकारा म्हणाले, “आम्हाला देशातील आघाडीच्या बँकेसोबत भागीदारी करताना आणि शेतकऱ्यांसाठी आमची नाविन्यपूर्ण शेती उपकरणे अधिक सुलभ आणि परवडणारी बनवताना आनंद होत आहे. आमची भागीदारी ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांना शेतीचे यांत्रिकीकरण करण्यास आणि त्याद्वारे उत्पादकता वाढविण्यास सक्षम करण्याच्या आमच्या संयुक्त उद्दिष्टाशी संरेखित आहे. व्हीएसटीमध्ये, शेतीचा एकूण वेळ आणि खर्च कमी करून आणि उत्पादन आणि शेतीचे उत्पन्न सुधारून, शेती सुलभ करण्यासाठी आमचा सतत प्रयत्न असतो. आम्हाला खात्री आहे की हा सामंजस्य करार विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आमची उत्पादने खरेदी करण्यासाठी त्रासमुक्त कर्ज सुविधा मिळवून देण्यास मदत करेल.”
दोन्ही संस्थांनी शेतकरी समुदायाला सशक्त बनवण्याचा एक समान दृष्टीकोन सामायिक केला आहे ज्यामुळे समस्या-मुक्त उपाय आणि कृषी क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रांचा अवलंब करण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ॲक्सिस बँक कमीत कमी कागदपत्रांसह सुलभ वित्त पर्याय ऑफर करेल. हे सहकार्य कृषी क्षेत्राला समर्थन आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
सोनी इंडियातर्फे एक्सएस-162GS आणि एक्सएस-160GS कार स्पीकर्स सादर
नवी दिल्ली, २० मे २०२४: सोनी इंडियाने आज ऑटोमोटिव्ह साउंडच्या क्रांतीत नवीन भर घालत XS-162GS आणि XS-160GS कार स्पीकर्स सादर केले. ज्यांना त्यांच्या फॅक्टरी कार ऑडिओमधून चांगला ऑडिओ अनुभव अपग्रेड...
जपानच्या सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपने वृद्धीला चालना देण्यासाठी एसएमएफजी इंडिया क्रेडिटमध्ये केली 1,300 कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई, 8 मे, 2024 : सुमितोमो मित्सुई फायनान्शियल ग्रुपने (SMFG) एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि.मध्ये राइट्स इश्युच्या माध्यमातून 1,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. (पूर्वी फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लि.) SMICC ने त्याच्या पूर्ण मालकीच्या एसएमएफजी इंडिया गृहफायनान्स कं.लि.मध्ये 150 कोटी रुपये गुंतवले आहेत. (पूर्वी फुलरटन इंडिया होम फायनान्स कंपनी लि.) (एसएमएफजी गृहशक्ती).
या घडामोडीवर भाष्य करताना, SMICC चे मुख्य वित्तीय अधिकारी श्री पंकज मलिक म्हणाले, “आमचा विश्वास आहे की, एसएमएफजीद्वारे गुंतवण्यात आलेला 1,300 कोटींचा निधी SMICC साठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ही धोरणात्मक वाटचाल आमच्या विस्ताराच्या प्रयत्नांना बळकट करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. देशातील सेवा नसलेल्या लोकसंख्येसाठी, परवडणारे गृहनिर्माण फायनान्स सोल्यूशन्स आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी SMICC ने एसएमएफजी गृहशक्तीमध्ये INR 150 कोटी गुंतवले आहेत. या गुंतवणुकीच्या आधारे, आम्ही आमच्या बाजारपेठेतील उपस्थिती वाढविण्यास, शाश्वत वाढ करण्यास आणि आमच्या ग्राहकांना मूल्य प्रदान करण्यास तयार आहोत.”
31 डिसेंबर 2023 रोजी SMICC ची ॲसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 42,487 कोटी रुपये होती, यात 24% वार्षिक वाढ झालेली आहे. एप्रिल 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीसाठीचे वितरण 28,790 कोटी रुपये होते जे 46% ची वार्षिक वाढ दर्शवते. कंपनीने आपली उपस्थिती देशभरातील 990 शाखांमध्ये विस्तारली आहे.
टायटनचे सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक घड्याळांचे नवीन कलेक्शन
सिरॅमिकचे सौंदर्य आणि ऑटोमॅटिक्स तंत्रज्ञान यांची सांगड असलेले कारागिरी आणि अचूकतेचे फ्यूजन अनुभवा
बंगलोर, ०३ मे, २०२४: टायटनने आपल्या सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स कलेक्शनमध्ये नवीन घड्याळे सादर केली आहेत. सुबकता आणि नावीन्य यांचा अतुलनीय तरीही सहजसुंदर मिलाप या नवीन घड्याळांमध्ये साधण्यात आला आहे. यंदाच्या वर्षभरात ब्रँड ऑटोमॅटिक्सवर खूप जास्त भर देत असून या कलेक्शनमध्ये सिरॅमिक बांधणी आणि टायटनने स्वतः तयार केलेली ऑटोमॅटिक मुव्हमेंट ही स्वतःची दोन सर्वात प्रभावी कौशल्ये एकत्र केली आहेत. त्यामुळे डिझाइन्सचा नाविन्यपूर्ण मिलाप असलेले टायटनचे सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स कलेक्शन ब्रँडच्या आजवरच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कारागिरी नेहमी उत्कृष्ट असावी याप्रती टायटन ब्रँडची बांधिलकी या कलेक्शनमधून दर्शवली जाते, इतकेच नव्हे तर, सिरॅमिक आणि टायटनचे स्वतःचे ऑटोमॅटिक कौशल्य यांचा मिलाप देखील यामधून दिसून येतो. टिकाऊपणा, ओरखडे न पडण्याची क्षमता, वजनाला हलके, हायपोअलर्जेनिक ही सिरॅमिकची वैशिष्ट्ये आणि टायटनच्या स्वतःच्या ऑटोमॅटिक मुव्हमेंटमुळे रंगांचे विविध पर्याय हे दोन्ही लाभ सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स वॉच कलेक्शनमध्ये मिळतात.
२२ ज्वेल्ससह ७ए२०-एस मुव्हमेंट असलेले हे कॅलिबर प्रति दिवशी -१० सेकंद ते +३० सेकंद अचूकतेसह आणि ३६ तासांच्या प्रचंड पॉवर रिझर्व्हसह डिझाईन करण्यात आले आहे. स्केलेटल डायल फेस नाजूक ऑटोमॅटिक मुव्हमेंट अतिशय सुंदर पद्धतीने दर्शवते. ड्युएल-टोन सॉलिड लिंक स्टेनलेस स्टील आणि सिरॅमिक ब्रेसलेट सुबक सौंदर्य दर्शवते. डोम्ड क्रिस्टल आणि काँकेव्ह तसेच स्क्वेयर डायल्स यांचा समावेश असलेले हे कलेक्शन आधुनिक आकर्षक सौंदर्य प्रस्तुत करते. ऑटोमॅटिक कौशल्य आणि सिरॅमिकचे आकर्षक सौंदर्य यांचा मिलाप असलेली ही बहुउपयोगी घड्याळे दिवसा तसेच संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये देखील वापरता येतात.
अतिशय अनोख्या आवडीनिवडी असलेल्या, पारखी पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या कलेक्शनमधील प्रत्येक घड्याळ फक्त ऍक्सेसरी नाही तर डिझाईन, तंत्रज्ञान आणि कालातीत सौंदर्य यांचा मिलाप असलेले स्टेटमेंट आहे. सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक वॉच कलेक्शनच्या किमती २४९९५ ते २६९९५ रुपयांदरम्यान आहेत. यंदाच्या वर्षी तयार केल्या जात असलेल्या ऑटोमॅटिक घड्याळांच्या आकर्षक श्रेणीमध्ये सिरॅमिक फ्यूजन ऑटोमॅटिक्स वॉच कलेक्शन महत्त्वाचा टप्पा आहे.
टायटन स्टोर्स आणि www.titan.co.in वर हे कलेक्शन उपलब्ध आहे. घड्याळ बनवण्याच्या कलेत उत्कृष्ट कामगिरी बजावण्याच्या बांधिलकीचे प्रतीक असलेल्या या रेन्जमध्ये टायटन ब्रँड अजून अनेक डिझाइन्स आणणार आहे.
