Industrialist
महिला स्टार्ट-अप्सना समर्थन देण्यासाठी बिट्स पिलानी व आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांचा नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मशी सहयोग
नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, भारतात ६.३ कोटी इतके सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. त्यांपैकी सुमारे २० टक्के उद्योग महिलांच्या मालकीचे आहेत आणि त्यांतून सुमारे २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार मिळतो. एका अंदाजानुसार, महिलांच्या उद्योजकतेला गती दिल्यास, भारतात महिलांच्या मालकीचे आणखी तीन कोटींहून अधिक उद्योग निर्माण होऊ शकतात आणि त्यांमधून सुमारे १५ ते १७ कोटी जणांना नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.
~ ईशान्येकडील राज्ये, राजस्थान, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत १.० साठी महिला नवउद्योजक’ हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू ~
मुंबई, २४ नोव्हेंबर २०२३ : 'पिलानी इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सोसायटी' या 'बिट्स पिलानी'च्या 'टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर'ने महिला उद्योजक मंचाच्या (विमेन एंटरप्रेन्योर प्लॅटफॉर्मच्या - डब्ल्यूईपी) संयुक्त विद्यमाने 'वुमनप्रेन्योर फॉर भारत १.०' (भारत १.० साठी महिला नवउद्योजक)हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम नीती आयोगाशी संबंधित आहे आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या सीएसआर विभागाने याकरीता सहकार्य केले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी धोरणात्मक दिशा ठरविणारी आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन ही सर्वोच्च संस्था आहे. राजश्री बिर्ला या फाउंडेशनच्या मार्गदर्शक आहेत, तसेच विशाखा मुळ्ये, डॉ. प्रज्ञा राम आणि सुभ्रो भादुरी हे फाउंडेशनचे संचालक आहेत.
अरुणाचल प्रदेशातील इटानगरमधील 'दोरजी खांडू स्टेट कन्व्हेन्शन सेंटर' येथे २४ नोव्हेंबर रोजी 'उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखाली विकास साधणे' या विषयावर राज्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. ही कार्यशाळा नीती आयोगाच्या राज्यांना मदत या अभियानाच्या अंतर्गत आणि अरुणाचल प्रदेश सरकार व महिला उद्योजक मंच यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती. विविध व्यवसाय, सरकार आणि नागरी समाजामध्ये नवकल्पना, उद्योजकता आणि सर्वसमावेशक विकास यांच्या परिसंस्था एकत्र आणून महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेद्वारे विकास साधणे या विषयावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
ईशान्येकडील राज्ये, राजस्थान, हरयाणा आणि जम्मू-काश्मीर या प्रदेशांतील मध्यम व लहान शहरांसाठी काम करणाऱ्या किंवा खुद्द तेथील स्थानिक महिला उद्योजकांना निधी आणि इतर मदत पुरविणे हे 'वुमनप्रेन्योर फॉर भारत १.०' या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. 'यूएन-एसडीजी' क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि त्या प्रदेशांतील व्यावसायिक वा सामाजिक आव्हाने सोडविणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाखालील नफा कमावणाऱ्या व ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना या उपकमाचा लाभ मिळू शकेल.
या घोषणेविषयी अधिक माहिती देताना 'आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन'च्या संचालिका व 'आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड'च्या सीईओ विशाखा मुळ्ये म्हणाल्या, “आम्ही देशासाठी समान, सर्वसमावेशक व दीर्घकालीन अशी सामाजिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘वुमनप्रेन्योर्स फॉर भारत १.०' या उपक्रमाच्या माध्यमातून, देशातील महिला उद्योजकांच्या प्रगतीला चालना देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. संधी मिळत नसलेल्या प्रदेशांतील भारतीयांना नाविन्यपूर्ण उपायांद्वारे सेवा पुरविण्याची क्षमता बाळगणाऱ्या उद्योजकांसाठी हा उपक्रम आहे.”
'बिट्स पिलानी'चे कुलगुरु प्रा. व्ही. रामगोपाल राव म्हणाले, “भारताच्या कानाकोपऱ्यातील विविधांगी लोकसंख्येला स्थानिक उद्योजकांकडून स्थानिक उपाय पुरविले जाण्याची आवश्यकता आहे. मला ठाम विश्वास आहे की नवकल्पनांच्या पुढच्या लाटेचे नेतृत्व महिला नवउद्योजिका, विशेषत: ईशान्येकडील राज्यांत राहणाऱ्या नवउद्योजिका करतील आणि त्या प्रदेशातील असाधारण स्वरुपाच्या समस्या त्याच सोडवतील. यातील काही नवकल्पना समाजासमोर आणण्यात आणि त्यांना वाढीसाठी मदत करण्यात महिला उद्योजक मंच आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”
या घडामोडींविषयी बोलताना 'डब्ल्यूईपी'च्या मोहीम संचालिका अॅना रॉय म्हणाल्या, “टेक-फॉर-गुड क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प धोरणात्मक स्वरुपाचा आहे. उत्तम बाजारपेठ असलेल्या, प्रभाव पाडण्याची क्षमता असणाऱ्या, लैंगिक समानतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी अनुरुप आणि महिलांच्या माध्यमातून विकास होणाऱ्या डिजिटल स्वरुपाच्या तांत्रिक क्षेत्राशी संबंधित हा प्रकल्प आहे. विशेष विकास क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून नवकल्पनांचे नेतृत्व करणाऱ्या महिला उद्योजिका या उद्योग आणि समाज या दोन्हींसाठी लक्षणीय लाभ मिळवून देऊ शकतात, हे सिद्ध झालेले आहे."
या उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या स्टार्ट-अप्सना १० लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर 'पीआयईडीएस'कडून 'इन्क्युबेशन'साठी सहकार्य, एकास एक स्वरुपाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, बाजारपेठ मिळविण्यासाठीची मदत आणि भविष्यात गुंतवणूक वाढवण्याच्या संधी, असे साह्यही या स्टार्टअप्सना दिले जाणार आहे. यामध्ये स्वारस्य असलेल्या नवोन्मेषक महिलांनी पुढील वेबसाईटवर अर्ज करावेत : https://www.f6s.com/womenpreneurs-for-bharat-1.0/apply
देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियान
मुंबई : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र शासना कडून राबविण्यात येत...
एपीएस-सी मिररलेस, बदलता येतील असे लेन्स असलेला अत्याधुनिक असा α६७०० कॅमेरा बाजारात आणण्याची सोनी इंडियाची घोषणा
आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ज्या वस्तूची प्रतिमा टिपायची आहे ते अतिशय स्पष्ट आणि निश्चितपणे ओळखणे आणि स्थिर फोटो व चलचित्रांची नवीनतम व आधुनिक प्रस्तुती करणे...
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सतर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि विमा जनजागृती शिबिराचे आयोजन
पुणे, १८नोव्हेंबर २०२३ : आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (“ABSLI/ कंपनी”), आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (“ABCL”) ने जीवन विमा उपकंपनी, लाइफ इन्शुरन्सबाबत जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने एक विशेष उपक्रम...
फेडएक्समुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर 80 अब्ज डॉलरहून अधिक थेट प्रभाव
~ डन आणि ब्रॅडस्ट्रीट यांच्याशी सल्लामसलत करून तयार केला अहवाल
~ पायाभूत सुविधा, शाश्वतता आणि नाविण्यता यात गुंतवणूक केल्याने भारतातील नेटवर्क झाले मजबूत
मुंबई १८ नोव्हेंबर २०२३ – फेडएक्स कॉर्प (NYSE:FDX) ने २०२३ या आर्थिक वर्षात कंपनीच्या जगभरातील नेटवर्कचे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम वाढवण्याच्या भूमिकेचे विश्लेषण करून वार्षिक आर्थिक प्रभाव अहवाल जारी केला. डन अँड ब्रॅडस्ट्रीट (NYSE: DNB) यांच्याशी सल्लामसलत करून अभ्यास करत फेडएक्समुळे जगभरातील सर्वसामान्यांवर आणि समाजावर काय परिणाम झाला याचा अहवाल सादर केला असून, त्याल फेडएक्स इफेक्ट असे संबोधले जाते.
“फेडएक्सने ग्राहकांच्या सतत विकसित होत असलेल्या गरजा लक्षात घेत व्यवसायांच्या वस्तू, सेवा आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करून पाच दशकांमध्ये जागतिक पुरवठा साखळी आणि ई-कॉमर्स क्रांती घडवून आणण्यास मदत केली आहे,” असे फेडएक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम म्हणाले. "हा अहवाल अर्थव्यवस्थेतील आमचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करतो आणि आम्ही जिथे काम करतो त्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्पण करतो, हेही या अहवालातून स्पष्ट होते"
अहवालात असे दिसून आले आहे की, जगभरात आर्थिक परिस्थिती कठिण असतानाही फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम करणारे ८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान दिले. यातून हेच दिसून येते की फेडएक्सने उत्तम नेटवर्क तयार केले आहे आणि नाविण्यपूर्ण प्रयत्नांमुळे व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांपर्यंत जलद गतीने सेवा पोहोचवता येत आहेत. या अहवालात भारतावर झालेल्या परिणामांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात कंपनीने २९०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे आणि कंपनी तीन आंतरराष्ट्रीय गेटवे चालवते.
फेडएक्सने १७ एप्रिल २०२३ रोजी ऑपरेशनची ५० वर्षे साजरी केली. कंपनीकडे जगातील सर्वात विस्तृत वाहतूक नेटवर्क आहे, ज्याद्वारे २२० पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये सेवा पुरविली जाते. याव्यतिरिक्त, फेडएक्स ५,००० पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये ५,००,००० लोकांना रोजगार देते आणि दररोज अंदाजे १४.५ दशलक्ष पॅकेजेस इकडून तिकडे पाठवते.
फेडएक्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्टच्या प्रमुख जागतिक हायलाइट्समध्ये या गोष्टींचा समावेश :
● अप्रत्यक्ष प्रभाव: फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जागतिक निव्वळ आर्थिक उत्पादनात अप्रत्यक्षपणे ३५ बिलियन डॉलरचे योगदान दिले.
● पुरवठा साखळी : फेडएक्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये अंदाजे १,००,००० पुरवठादारांशी करार केला - त्यापैकी ९०% छोटे व्यवसायिक होते. २०२२ मध्ये अंदाजे ७३,००० युनिक पुरवठादारांसह केलेल्या खर्चाच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की कंपनीने या पुरवठादारांसोबत केलेल्या खर्चामुळे ११ लाख नोकऱ्यांना आधार मिळाला.
● व्यापार: आपल्या ग्राहकांना अधिक बाजारपेठेतील प्रवेश आणि कार्यक्षमता प्रदान करणार्या व्यापार धोरणांचे फेडएक्सने कायम समर्थन केले आहे. डी मिनिमिस अलाउंसेस सारख्या तरतुदींचा अंगीकार केल्याने सर्व आकारांच्या व्यक्ती आणि व्यवसायांना शुल्क आणि करांशिवाय कमी-मूल्याच्या वस्तू आयात करणे शक्य होते.
भारताचा प्रभाव
एक्सप्रेसने भारतात १९८४ मध्ये कार्य सुरू केले आणि देशाने आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका (AMEA) प्रदेशाशी कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अभ्यासात असे आढळून आले की, फेडएक्स एक्सप्रेसने वित्त वर्ष २३ मध्ये भारतासह AMEA मध्ये विस्तृत नेटवर्कसह वाहतूक, स्टोरेज आणि कम्युनिकेशन्स क्षेत्रातील निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.३% योगदान दिले आहे. AMEA अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये, फेडएक्स एक्सप्रेसने एकूण निव्वळ आर्थिक उत्पादनात ०.०२% योगदान दिले, जे वित्त वर्ष २०२३ मध्ये अंदाजे ६% वाढून ४४ ट्रिलियन डॉलर झाले.
फेडएक्स एक्सप्रेस मिडल ईस्ट, भारतीय उपखंड आणि आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले की, “जगातील सर्वात विस्तृत वाहतूक नेटवर्कसह, आम्ही जागतिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्मार्ट आणि शाश्वत उपायांद्वारे मूल्य पोहोचवण्यासाठी समर्पित आहोत. भारतातील नाविन्यता आणि वाढीस चालना देण्यासाठी स्थानिक प्रतिभांचे पालनपोषण करणे आणि प्रगत क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विस्तार करणे ही आमची वचनबद्धता आहे. असे केल्याने, आम्ही केवळ जगभरातील व्यवसायांना जोडले जात नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आणि विकासात योगदान देतो.”
फेडएक्स एक्सप्रेस त्यांच्या भारतीय ताफ्यात अलीकडेच ३० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने (EVs) दाखल केली आहेत. नवी दिल्ली कार्गो कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या गेटवेला त्यामुळे पूरक सुविधा मिळाली आहे. या सुविधेमध्ये सौर ऊर्जा आणि प्रगत व्हेरिएबल रेफ्रिजरंट व्हॉल्यूम कूलिंग सिस्टीम यासारख्या टिकाऊ वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळे विजेचा वापर अंदाजे १५% कमी होतो.
याव्यतिरिक्त, भारताच्या नवकल्पना अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध फेडएक्स एक्सप्रेस आहे. मार्च २०२३ मध्ये, कंपनीने हैदराबादमध्ये आपली पहिली अॅडव्हान्स्ड कॅपॅबिलिटी कम्युनिटी (ACC) उघडण्याची सुरू करण्याची जाहीर केली. फेडएक्स ACC मध्ये तांत्रिक आणि डिजिटल नवकल्पनांच्या विकासास समर्थन देण्यासाठी पूर्ण-वेळ कर्मचारी नियुक्त केले जातील, जे फेडएक्सला जागतिक पुरवठा साखळी इकोसिस्टममध्ये आणखी मोठे मूल्य प्रदान करण्यास सक्षम करतील. भारतातील तसेच विस्तीर्ण प्रदेशात सुरुवातीच्या टप्प्यातील डिजिटल स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने मे 2023 मध्ये फेडएक्स इनोव्हेशन लॅब (FIL) लाँच केली.
