मुंबई : भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र शासना कडून राबविण्यात येत असून या मोहिमेचे उढ़घाटन माननीय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा खूंटी, झारखंड येथे जनजाति गौरव दिना चे औचित्य साधुन करण्यात आले.
देशातील खतनिर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायज़र्स लिमिटेड सह विविध खत उत्पादक कंपन्या या मोहीमेत सहभागी आहेत. कृषि क्षेत्रात अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे नॅनो यूरिया, नॅनो डीएपी आणि अन्य सूक्ष्म पोषक खतांची फवारणी प्रात्यक्षिका बरोबर रासायनिक खतांचा अनावश्यक दुरुपयोग टाळुन मातीचे योग्य आरोग्य राखण्यासाठी खतांचा संतुलित वापर यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात येत आहे. आरसीएफ़च्या वतीने यासंबंधी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व शेतकर्यांसाठी मृदा परिक्षण, कृषि प्रदर्शन व मेळावे, पीकप्रात्यक्षिक वगैरे कार्यक्रम नेहमी राबवले जातात.
ही मोहीम भारत सरकार अंतर्गत येणारया विविध मंत्रालयांमार्फत राबविण्यात येत असून माहिती व प्रसारण मंत्रालय, कृषि मंत्रालय व उर्वरक विभाग यांच्या विशेष सहभागातून होत आहे. सदर मोहिमेचा उद्देश्य हा केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत असणारया विविध लोकाभिमुख योजनांची माहिती जनसामान्या पर्यंत पोहोचविणे हा आहे. या उपक्रमाची सुरुवात भारतातील सर्व आदिवासी जिल्ह्यातुन करण्यात आली असून दिनांक २४ जानेवारी, २०२४ पर्यंत हा उपक्रम देशभर राबवला जाणार आहे.