Feature Slider

शिक्षण विकासातून सशक्त समाजनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांना सहकार्य-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.६: शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासोबतच चांगल्या समाजाची निर्मिती होत असते; त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत सशक्त समाजनिर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून...

सप्तशृंगी मातेची प्रतिमा आणि साडेतीन शक्ती पीठाचा प्रसाद देऊन उध्दव ठाकरेंना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या घवघवीत यशासाठी शुभेच्छा

मुंबई, : नवरात्रीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून ''साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनानिमित्त बये दार उघड'' मोहिम आयोजित केली होती. यात दिनांक २७ आणि...

धरणात पाणी मावेना अन पुणेकरांना मात्र ते देता येईना -प्रशासनाच्या हलगर्जी कारभारावर नितीन कदम बरसले

पुणे-धरणे वारंवार भरताहेत ,नदीत पाणी सोडले जातेय ,ऑक्टोबर मध्येही पाऊस थांबायचे नाव घेईना , धरणात पाणी मावेना पण ते पुणेकरांना देता येईना .. असा...

अवधूत गांधी साकारणार संत नामदेव. 

 सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.  प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका  संताचा प्रवेश होणार आहे.     संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली आहे. आता मालिकेत संत नामदेव यांचा प्रवेश होणार आहे. माउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. संत नामदेव यांची भूमिका सलाम पुणे पुरस्काराचे मानकरी असलेले  अवधूत गांधी साकारणार आहेत. अवधूत गांधी हे वारकरी संप्रदायातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. ते ज्ञानेश्वर माउली मालिकेचा  सुरुवातीपासूनच भाग आहेत. याविषयी  त्यांचा अभ्यास फार महत्त्वाचा  आहे. त्यांच्या या  वेशाची/पेहेरावाची प्रेक्षकांमध्ये  चर्चा होईल, यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर माउली यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी  उत्कंठा वाढवणारे असेल.

एमआयटीचा ४था दीक्षांत समारंभ:४५७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार

पुणे, ६ ऑक्टोबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा चौथा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता, विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे...

Popular