Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कॅटामारनने चेअरमन आणि प्रेसिडेंट यांच्या नियुक्तीची घोषणा केली

Date:

बंगलोर-

आघाडीची गुंतवणूक कंपनी कॅटामारनने चेअरमनपदी श्री. एम. डी. रंगनाथ यांची नियुक्ती केल्याची घोषणा आज केली.  गेली तीन वर्षे या कंपनीचे प्रेसिडेंट असलेले श्री. रंगनाथ यांनी कंपनीच्या गुंतवणुकी आणि त्यांच्या कामगिरीच्या वृद्धीचा मजबूत पाया उभारण्यामध्ये भरीव भूमिका बजावली आहे.

कॅटामारनचे प्रेसिडेंट म्हणून श्री. दीपक पदकी यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा देखील कंपनीने केली आहे. उद्यमींच्या संकल्पनांना खतपाणी घालून त्यातून प्रभावी व्यवसाय परिणाम साध्य करण्याच्या मिशनमध्ये कंपनीच्या गुंतवणूक व्यवस्थापन धोरणाला चालना देण्याची जबाबदारी प्रेसिडेंट म्हणून श्री पदकी यांच्यावर असेल. श्री. पदकी जागतिक आयटी सेवा आणि सॉफ्टवेयर उत्पादन उद्योगक्षेत्रात गेली तीस वर्षे काम करत असून स्ट्रॅटेजी, एमअँडए, व्हेंचर फंडिंग व रिस्क मॅनेजमेंट यामध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

संस्थापक व चेअरमन एमिरिटस श्री. एन. आर. नारायण मूर्ती म्हणाले, चेअरमनपदी श्री. रंगनाथ यांची नेमणूक झाल्याचा मला आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात वेगाने वृद्धी करून बाजारपेठेतील महत्त्वाची कंपनी म्हणून अधिक बळकट बनण्यात या कंपनीला त्यांनी मदत केली आहे.”  ते पुढे म्हणाले, “श्री दीपक यांचे स्वागत करताना देखील मला खूप आनंद होत आहे.  वाटचालीतील नव्या टप्प्यामध्ये पुढे झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या कॅटामारनला त्यांच्या अनुभवांचा आणि नेतृत्वाचा खूप लाभ मिळेल.” 

कॅटामारन

कॅटामारन ही एक अनेक बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणारी कंपनी असून तिचे मुख्यालय भारतात बंगलोरमध्ये आहे. नाविन्यपूर्ण व्यवसाय निर्माण करून त्यांची वाढ व्हावी यासाठी स्टेज-इग्नोस्टिक उत्प्रेरक म्हणून आम्ही काम करतो. आम्ही जगभरातील वैविध्यपूर्ण संपत्ती वर्गांमध्ये गुंतवणूक करतो.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...