एम 3 करंडक आंतरक्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत केडन्स संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Date:

व्हेरॉक संघाचा क्लब ऑफ महाराष्ट्र संघावर सनसनाटी विजय; पवन शहाची शतकी खेळी ; 

 पुणे – पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत ब गटात हर्षल काटे नाबाद 97धावांच्या जोरावर केडन्स क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा  63 धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. तर,  पवन शहा( 102 धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा  5 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदविला. 
पीवायसी हिंदू जिमखाना व नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात काल डेक्कन जिमखाना संघावर एका धावेने थरारक विजय मिळविणाऱ्या केडन्स क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवली. पहिल्यांदा खेळताना केडन्स संघाने 45 षटकात 4बाद 301धावाचे आव्हान उभे केले. यात अजिंक्य गायकवाडने 87चेंडूत 75धावा व प्रद्युम्न चव्हाणने 60चेंडूत 53धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 115चेंडूत 106 धावांची भागीदारी करून संघाचा पाया भक्कम केला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हर्षल काटे याने अफलातून फटकेबाजी करत 46चेंडूत 15चौकार व 2 षटकारांसह नाबाद 97 धावा आणि अथर्व काळेने 44 धावा करून संघाला 301धावाचे लक्ष उभे करून दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 41.1 षटकात 238धावावर संपुष्टात आला. वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे युनायटेड स्पोर्ट्स क्लब 12.2 षटकात 5 बाद 62धावा असा अडचणीत आला. त्यानंतर आनंद ठेंगे(89धावा) व शंतनू खेनट(49धावा) यांनी धावा काढून संघाचा डाव सावरण्याचा प्रयन्त केला. पण तो अयशस्वी ठरला. केडन्सकडून इझान सय्यद(3-29), यतीन मंगवाणी(2-39), प्रद्युम्न चव्हाण(2-40), कौशल तांबे(1-37)यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सुकर केला. सामनावीर हर्षल काटे ठरला. 
नेहरू स्टेडियम मैदानावरील दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 44.1षटकात 209 धावावर संपुष्टात आला. यात यश क्षीरसागरने 105 चेंडूत 7चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 84 धावा,  राजवर्धन उंडरेने 75 चेंडूत 46धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 147 चेंडूत 112 धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर अद्वैत मुळ्येच्या 26, विराज दारवटकरच्या 26धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. व्हेरॉककडून रोहित चौधरी(3-40), कपिल गायकवाड(2-46), मनोज यादव(1-25), राहुल वारे(1-41) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला 209 धावांवर रोखले. याच्या उत्तरात हे आव्हान व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने 39.2षटकात 5 बाद 211धावा करून पूर्ण केले. यात पवन शहा याने 111चेंडूत 14चौकारांसह 102 धावांची तुफानी शतकी खेळी केली. पवनला ओम भोसले 63 धावा करून साथ दिली. पवन व ओम यांनी दुसऱ्या गड्यासाठी 150चेंडूत 140 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या मोलाचा वाटा उचलला. शतकी खेळी करणारा पवन शहा सामन्याचा मानकरी ठरला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सुपरलीग फेरी:क्लब ऑफ महाराष्ट्र: 44.1षटकात सर्वबाद 209 धावा(यश क्षीरसागर 84(105,7×4,1×6),  राजवर्धन उंडरे 46(75,2×4), अद्वैत मुळ्ये 26(29,2×4,1×6), विराज दारवटकर  26(15,3×4,1×6), रोहित चौधरी 3-40, कपिल गायकवाड 2-46, मनोज यादव 1-25, राहुल वारे 1-41) पराभूत वि.व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 39.2षटकात 5 बाद 211धावा(पवन शहा 102(111,14×4), ओम भोसले 63(70,8×4), मिझान सईद 18(18), शुभम मेड 2-32, वैभव गोसावी 1-12, प्रज्वल गुंड 1-58, यश क्षीरसागर 1-34);सामनावीर-पवन शहा; व्हेरॉक संघ 5 गडी राखून विजयी;  
पीवायसी मैदान: केडन्स क्रिकेट अकादमी: 45 षटकात 4बाद 301धावा(हर्षल काटे नाबाद 97(46,15×4,2×6), अजिंक्य गायकवाड 75(87,9×4,1×6), प्रद्युम्न चव्हाण  53(60,8×4,1×6), अथर्व काळे 44(59,3×4,1×6), सिद्धेश वरघंटी नाबाद 14, आनंद ठेंगे 2-70, आदित्य मोरे 1-23, अद्वैय शिधये 1-54) वि.वि. युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 41.1 षटकात सर्वबाद 238धावा(आनंद ठेंगे 89(67,6×4), शंतनू खेनट 49(71,8×4), महेश मस्के 25(17), ऋतुराज गायकवाड नाबाद 24(13), आदित्य राजहंस 16, इझान सय्यद 3-29, यतीन मंगवाणी 2-39,  प्रद्युम्न चव्हाण  2-40, कौशल तांबे 1-37)सामनावीर-हर्षल काटे; केडन्स संघ 63 धावांनी विजयी.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...