लघु व्‍यवसायांसाठी बिझनेस लोन कार्निवल लाँच

Date:

मुंबई: सणासुदीच्‍या काळानिमित्त लघु व्‍यवसायांना क्रेडिट सुविधा देण्‍यास चालना देण्‍यासाठी निओग्रोथ या लघु व्‍यवसायांना सेवा देणा-या भारताच्‍या आघाडीच्‍या डिजिटल लेण्‍डर कंपनीने नुकतेच त्‍यांच्‍या डी२सी उपक्रमांतर्गत एमसएमई ग्राहकांसाठी ‘बिझनेस लोन कार्निवल’च्‍या लाँचची घोषणा केली.

सध्‍या मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद व व नवी दिल्‍ली येथे कार्यरत असलेले बिझनेस लोन कार्निवल संपूर्ण ऑक्‍टोबर व नोव्‍हेंबर महिन्‍यामध्‍ये आयोजित करण्‍यात येणार आहे. कंपनीने एमएसएमईंना त्‍यांच्‍या विविध व्‍यवसाय गरजांसाठी त्रासमुक्‍त कर्ज मिळण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी प्रक्रिया सुलभ व डिजिटाईज केली आहे. आगामी सणासुदीच्‍या काळासाठी टच पॉइण्‍टवर त्‍वरित मान्‍यता देत लघु व्‍यवसायांसाठी कर्ज मंजूरी त्‍वरित केली जात आहे. निओग्रोथ आकर्षक बक्षीसांसोबत रोचक स्‍पर्धांच्‍या माध्‍यमातून ग्राहकांशी संलग्‍न देखील होत आहे.  

निओग्रोथच्‍या नवीन व्‍यवसाय व्‍याप्‍ती निओकॅश इन्‍स्‍टा लोन, वेण्‍डर फायनान्‍स एक्‍स्‍प्रेस अशा नवीन उत्‍पादनांच्‍या माध्‍यमातून कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचल्‍या आहेत आणि या उत्‍पादनांनी या विकासामध्‍ये योगदान दिले आहे. नवीन सुरक्षित ऑफरिंग ‘प्‍लस लोन्‍स’ ग्राहकांच्‍या व्‍यापक गरजांची पूर्तता करत आहे. नवीन उत्‍पादन ऑफरिंग्‍जमध्‍ये विविध वैशिष्‍ट्ये आहेत- जसे एण्‍ड-टू-एण्‍ड डिजिटल प्रक्रिया, एआय/एमएल आधारित स्‍कोअरकार्डसद्वारे संचालित त्‍वरित मंजूरी. बिझनेस लोन कार्निवलसह कंपनीला या सकारात्‍मक बाजारपेठ व इकॉनॉमी सेण्टिमेंटचा लाभ घेत ही उत्‍पादने ग्राहकांपर्यंत पोहोचण्‍याची आशा आहे.

निओग्रोथचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरूण नय्यर म्‍हणाले, ”दुसरी लाट ओसरत असताना यंदा भारतीय ग्राहक जवळपास कोविडपूर्व पातळ्यांप्रमाणे खरेदी करण्‍याची अपेक्षा आहे. यामुळे रिटेलर्स, लघु व्‍यवसाय व अर्थव्‍यवस्‍थेला मोठ्या प्रमाणात अत्‍यावश्‍यक चालना मिळेल. निओग्रोथच्‍या ग्राहकांचा पुढील दोन महिन्‍यांसाठी सकारात्‍मक व्‍यवसाय दृष्टिकोन आहे आणि आमचा त्‍यांना या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून झपाट्याने कर्ज मंजूरी देत संबंधित संधींमधून लाभ मिळण्‍यामध्‍ये मदतीचा हात पुढे करण्‍याचा मनसुबा आहे.”  

व्‍यवसायांना भविष्‍यासाठी सुसज्‍ज बनण्‍यामध्‍ये मदत करण्‍याकरिता निओग्रोथ अद्वितीय व्‍यासपीठ ‘डिजिबिझ’ देखील सादर करत आहे. हे व्‍यासपीठ लघु व्‍यवसायांना त्‍यांच्‍या डिजिटल सुसज्‍जतेचे मूल्‍यांकन करण्‍यामध्‍ये सक्षम करते आणि अपग्रेड होत अधिक स्‍पर्धात्‍मक असण्‍यामध्‍ये मदत करते. कंपनीने ३१ भागीदारांसोबत सहयोग केला आहे आणि लघु व्‍यवसायांना त्‍यांच्‍या आवश्‍यकतांनुसार त्‍यांच्‍या कार्यसंचालनांना डिजिटाईज करण्‍यासाठी १६ सेवा विभाग देते. ज्‍यामुळे त्‍यांना योग्‍य उपाययोजना ओळखत लाभ मिळेल. आतापर्यंत २४,००० हून अधिक लघु व्‍यवसायांनी डिजिबिझ व्‍यासपीठामध्‍ये सहभाग घेतला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर; १६ एप्रिलचे विधेयक देश तोडणारे: नाना पटोले

भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; मुंबई, दि. २४ एप्रिल २०२६. भारतीय जनता...

भाजप म्हणजे ‘बकासुराचा’ पक्ष!:न्याय हवा असेल तर ‘बागेश्वर बाबां’कडे जायचे का?

मुंबई-भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना...