पुण्यात रंगला ‘बॉईज ३’चा भव्य दिव्य म्युझिकल सोहळा

Date:

‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि आता ‘बॉईज ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर ‘बॉईज ३’चा म्युझिकल अल्बम चांगलाच चर्चेचा विषय ठरला. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ३’ चित्रपटातील गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ मधील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ‘लग्नाळू’, ‘गोटी सोडा’ ही गाणी डान्स, पार्टी अँथम बनली असून आताच नवीन आलेल्या ‘लग्नाळू २.०’ ने पुन्हा एकदा सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावत आहे.

‘बॉईज ३’ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुण्यात भव्य दिव्य म्युझिकल सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ‘बॉईज ३’ भव्य म्युझिकल सोहळ्यात चित्रपटातील सुपर हिट गाण्यांची मैफिल रंगली होती. हजारो लोकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांचा कडकडाट, सांगितिक वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच आणि साथीला कमालीचे गायक यामुळे ही संगीतमय संध्याकाळ प्रेक्षकांसाठी आनंददायी ठरली. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते सह अनेक गायकांचा सहभाग होता तसेच नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढली.

संगीत सोहळ्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ” ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ ला जसं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तसंच ‘बॉईज ३’ ला ही मिळेल याची खात्री आहे. ‘बॉईज ३’ची ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहे, त्यावर चर्चा होत आहे याचा मला आनंद आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटातील गाण्यांवर लोक थिरकत आहेत. चित्रपटामध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी आहेत. लवकरच सर्व गाणी प्रेक्षकांच्या समोर येतील. ‘बॉईज ‘ व ‘बॉईज २’ला प्रेक्षकांचा जसा उत्तम प्रतिसाद मिळाला तसाच ‘बॉईज ३’च्या अल्बमला देखील मिळेल, अशी आशा मला आहे.”

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...