पुणे- भारतीय जनता पार्टी च्या पुणे शहर विभागातील विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांची निवड आज घोषित करण्यात आली या मध्ये भाजपच्या पुणे शहर महिला अध्यक्षा म्हणून अर्चना तुषार पाटील या माजी खासदार संजय काकडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेविकेची निवड करण्यात आली तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर बाप्पू उर्फ राघवेंद्र मानकर यांची निवड करण्यात आली. मानकर हे खासदार गिरीश बापट यांचे कट्टर समर्थक आहेत .ओबीसी आघाडी अध्यक्षपदावर योगेश पिंगळे या माळी समाजातील कोरेगाव पार्क परिसरातील युवा कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे .आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने महत्वपूर्ण हालचालींना प्रारंभ केल्याचे या निवडीच्या नावावरून मानले जाते आहे.
शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज या नियुक्त्या घोषित केल्या आहेत . युवती आघाडी च्या अध्यक्षपदी निवेदिता एकबोटे यांची निवड तर अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्षपदावर अन्वर पठान यांची निवड करण्यात आली आहे. व्यापारी आघाडी अध्यक्षपदावर महेंद्र व्यास ,तर वकील आघाडी अध्यक्ष पदावर इशानी जोशी ,विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदावर अंकित तिवारी ,झोपडपट्टी आघाडी अध्यक्षपदी विशाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आली दारूवाला यांची अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रभारी पदावर निवड करण्यात आली आहे. या शिवाय उपाध्यक्ष, चिटणीस ,सरचिटणीस यांच्या नियुक्त्याही आज करण्यात आल्या आहेत .
काकडे आणि बापट हेच हुकमाचे एक्के
जरी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे शहराचे नेतृत्व असले तरी प्रत्येक वेळी विविध पदांवर होणाऱ्या निवडी मध्ये यावेळी माजी खासदार संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आता संधी मिळू लागली आहे. बापट -काकडे अशी रस्सीखेच होऊ न देता होणाऱ्या पदांची वाटपे पहाता ,चंद्रकांत दादा पाटील हे ‘काकडे व बापट हेच येथील हुकुमाचे एक्के आहेत हे जाणून मोठ्या संयमान समतोल राखीतकार्यकर्त्यांच्या फौजा सांभाळीत असल्याचे मत समीक्षकांकडून व्यक्त होते आहे . मात्र तरीही जुनी कार्यकर्ती मंडळी मात्र अजूनही पक्षाने सामावून न घेतल्याच्या बाबीकडे देखील लक्ष वेधण्यात येते आहे.