Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्याची ताकद, गिरीश बापट ….या एकाच घोषणेने भाजप कार्यालय फुलले

Date:

 

 

पुणे : : महानगरपालिकेचा कारभारी बदला, पुण बदलेल अशा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या सूचक आवाहनाला पुणेकरांनी आपल्या मतपेटीतून सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे या अभूतपूर्व यशाचा सोहळा साजरा करण्यासाठी विजयी उमेदवारांनी भाजप कार्यालयाबाहेर अक्षरशः रीघ लावली. गुलालाची उधळण करत तसेच पुष्पगुच्छ, पेढे वाटून त्यांनी आपला आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला. “पुण्याची ताकद गिरीश बापट” अशा एकाच घोषणेने भाजप कार्यालय फुलून गेले. कोणी पक्षाचे झेंडे फडकवत होते तर कोणी भाजपचे प्रचार गीत वाजवून जल्लोष करत होते. उमेदवार आणि कार्यकर्त्यांची झुंबड दुपारपासूनच लोटल्याने पक्ष कार्यालय दुमदुमून गेले.

 

यावेळी विविध प्रभागातील विजयी उमेदवारांनी पालकमंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची भेट घेतली. नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बापट यांनी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच त्याच्यावर आता जबाबदारी वाढली असल्याची जाणीव त्यांना करून दिली. आपला आनंद साजरा करताना इतरांना त्रास होऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावणे, फटाके वाजवणे असे वर्तन करू नये असे आवाहन त्यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना केले. पुणेकरांनी आपल्याला दिलेल्या संधीचे आपण सोने करायचे आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच आपले ध्येय असायला हवे त्यादृष्टीने आपण कार्य करावे असे मार्गदर्शन बापट यांनी भावी नगरसेवकांना केले.  यावेळी पोलिसाचाही चोख बंदोबस्त तैनात होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...