धीरज घाटे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

Date:

पुणेः भारतीय जनता.पार्टीचे पुणे शहर प्रभारी श्री. धीरज घाटे यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी (सचिव) नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज ही नियुक्ती जाहीर केली.

धीरज घाटे यांच्या नवी पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

धीरज यांना भविष्यात आणखी मोठ्या जबाबदा-या पार पाडायच्या आहेत. त्यासाठी त्यांनी सज्ज रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. धीरज यांचे हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी हक्काचे घर ठरावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

धीरज यांनी परभणी आणि बीड येथे चार वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले आहे. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर त्यांनी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे काम सुरू केले. संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली. नंतरच्या काळात दोनवेळा पुणे शहर सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते पुणे शहर भाजपा प्रभारी आहेत.

२००७ आणि २०१२ मध्ये वहिनी सौ. मनिषा धनंजय घाटे यांना नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर २०१७ मध्ये धीरज घाटे हे प्रभाग क्र. २९ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पक्षाने पुणे महानगरपालिकेत सभागृह नेता ही जबाबदारी सोपविण्यात आली. वर्षभरानंतर त्यांना पुणे शहर प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

विचारांवर श्रद्धा, पक्षावर निष्ठा आणि कार्यकर्त्यांचे संघटन ही धीरज यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. साने गुरूजी तरुण मंडळ आणि हिंदूगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहेत. बीडमधील दुष्काळ, आंबिल ओढा पूर आणि कालवा फुटीदरम्यान त्यांनी मोठे मदतकार्य केले. कोरोना काळात त्यांनी पंधरा ते अठरा हजार कुटुंबांना काही महिने शिधा पुरविण्यासह अनेक क्षेत्रात त्यांनी मोठे मदतकार्य केले आहे.

त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या जाहिरातीं:तज्ज्ञ समिती स्थापन करणार

– मंत्री ॲड.आशिष शेलार मुंबई, – महाराष्ट्रात लैंगिक अपराधास प्रवृत्त...

पावसाळी गटारे की ड्रेनेज लाईन? गोंधळामुळेच नागरिकांची दिशाभूल

विशेष लेख | शरद लोणकर पाऊस सुरू झाला की पुण्यातील...

गुजरातमध्ये पूरस्थिती; १९ जणांची सुटका, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा कहर

अहमदाबाद / मुंबई | प्रतिनिधी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार...

केके आय इन्स्टिट्यूटचा प्रगत ग्लॉकोमा शस्त्रक्रियांसाठी परिसंवाद संपन्न

पुणे,  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील केके आय इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच...