मी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)
पुणे-एक व्यक्ती एक पद असे काही भाजप मध्ये नाहीये ,रावसाहेब दानवे आणि अन्य नेत्यांनी नाही का पदे असताना निवडणुका लढविल्या असे सांगत भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आणि पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांना आज अध्यक्षपदाची सूत्रे घेताच धक्का दिला आहे. तर सरचिटणीस पदी निवड झालेले गणेश बिडकर यांनी कसब्यातून निवडणूक लढविण्याची आपली इच्छा आहेच हे सांगत पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडत आलोय आणि पार पाडू असे स्पष्ट केल्याने भाजपा च्या विधानसभा इच्छुकांच्या गोटात खळबळ उडणार आहे.
या दोघांना पक्ष संघटनेत हि पदे मिळाल्यानंतर महापालिकेतील नेते असलेल्या त्यांच्या मतदार संघातील इच्छुकांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर झाल्याचे मानण्यात येत असताना या दोघांनीही इच्छुकांच्या यादीत आपण आहोतच हे स्पष्ट केले आहे.
आज भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे माधुरी मिसाळ यांनी हाती घेतली यावेळी त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयात मोठी गर्दी केली होती . फटाके वाजवून त्यांचे येथे स्वागत करण्यात आले .यावेळी माध्यामंशी बोलताना पहा आणि ऐका नेमके मिसाळ आणि बिडकर काय म्हणाले .