राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची मोहीम

Date:

पुणे :

प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन,मुरुडकर झेंडेवाले,पासोडया मारूती मंदिरासमोर बुधवार पेठ येथे जमा करावेत, असे आवाहन  फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर, कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव  यांनी केले आहे.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात  किंवा गटारात पडलेले आढळतात.

प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. तरी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे.जमा साहित्याची   शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.या मोहिमेत सामिल होण्यासाठी  महितीपत्रक  व बॉक्सेस  हे फाउंडेशन तर्फे विनामूल्य  पुरवले जातील . गिरीश मुरूडकर -9822013292,राहुल भालेराव -9822596011 यांच्याशी  संपर्क साधता येईल.ज्या तिरंग्यासाठी हजारोनी बलिदान केले,तो तिरंगा पायदळी जाऊ नये,याची काळजी घ्यावी, ध्वजविषयक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहनही फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय विनोदमूर्ती प्रकाश इनामदार...

हिंजवडीत अनधिकृत होर्डिंग्जवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा; लक्ष्मी चौकातील आठ फलक हटविले!

कारवाईच्या धास्तीने सहा फलक मालकांनी स्वतःहून काढले; उर्वरित दोन...

वीज पुरवठा आदी समस्या तातडीने सोडवाव्यात

आमदार शिरोळे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना पुणे : सोसायट्यांमध्ये भूमिगत...

राज्य सरकारकडून डिजिटल मिडियाचा वापर :वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद

मुंबई- महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि...