Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ख्यातनाम असलेल्या बालाजी तांबेंवर गुन्हा दाखल… पुत्रप्राप्तीचा प्रचार आणि गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग..

Date:

पुणे- पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणात ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’पुस्तकाचे लेखक बालाजी तांबे तसेच प्रकाशक व पुस्तक विक्रेते त्यांच्याविरोधात संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुर्वेदीय गर्भसंस्कार पुस्तकातून पुत्रप्राप्तीचा प्रचार करून गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याबद्दल कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सांकडे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक व विक्रेत्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर संबंधितांकडून खुलासे मागविण्यात आला होते. हा विषय आयुर्वेदशास्त्राशी संबंधित असल्याने त्याबाबत तज्ज्ञांचे मत घेण्याचे ठरले. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. विद्यापीठाने तांबेलिखित पुस्तकाचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती.
समितीने या पुस्तकातील मजकुराचा अभ्यास करून आपला अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला. त्यात बालाजी तांबे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून लिंग निवडीबाबतचा आरोपीचा हेतू सिद्ध होतो, त्यामुळे लोकांमध्ये पुरुषप्रधानत्वाचा दृष्टिकोन दृढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याबद्दलच्या जनजागृतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गर्भलिंग पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्य आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण) अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांचा अभिप्राय मागविण्यात आला. त्यावर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविले. जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू  केली.अतिरिक्त संचालकांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर, राज्य सरकारच्या वतीने संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजीव घोडके यांनी १३ जून रोजी संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बालाजी तांबे, पुस्तकाचे प्रकाशक व विक्रेता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...