पुणे- नागरिकांनी बाहेर पडू नये ,आणि करोना सारख्या संसर्गापासून आपल्या जीविताची काळजी घ्यावी या साठी शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी उद्या पासून आपल्या प्रभागातील घरोघरी जाऊन १० हजार सॅनिटायजर च्या बाटल्या मोफत देण्याचे घोषित केले आहे. मी आणि माझा शिवसैनिक नागरी सुरक्षेसाठी सज्ज आहोत असे त्यांनी सांगितले
भानगिरे हे प्रभाग क्र २६ मधून निवडून आलेले आहेत . ते म्हणाले, हा प्रभाग म्हणजे माझे कुटुंब मी मानतो आणि या प्रभागाची या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मला सेवक हाणून लोकांनी निवडून दिले आहे . या पूर्वी मास्क वाटप केले आहे. लोक स्वतः स्वतःची काळजी घेवू शकतात पण त्यांच्याशी संवाद साधून सुरक्षेची जाणीव निर्माण करणे महत्वाचे आहे शिवाय सॅनिटायजर च्या जास्त मागणी मुळे तुटवडा जाणवू लागल्याने व मेडिकल तसेच हॉस्पिटल मध्ये उपलब्ध होत नसल्या कारणाने किंवा काळा बाजार होऊ लागला आहे. लोकांना दुकानोदुकानी फिरावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर आपण आता हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. आपण आणि निवडक शिवसैनिक हे वाटप मोफत करतील . त्यामुळे यासाठी लोकांना एकत्र केले जाणार नाही ,गर्दी केली जाणार नाही .असे त्यांनी सांगितले. उद्या दिनांक१९ /३/२०२० रोजी पासून मोफत सॅनिटायजर घरपोच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस बद्दल माहिती व काळजी कशी घ्यावी या बद्दल ची माहिती आवश्यक तिथे दिली जाईल
लोकांनी कोणत्याही प्रकारच्या प्रकारच्या अफवाना बळी पडू नये ,कधीही गरज लागल्यास २४ तास पुढील नंबर वरती संपर्क करावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
किरण जबूकर-+918055929371
राहुल -+917399167171
विनायक पाटील -+919689837171
राजू गवळी-+919763711313
अतुल धर्माधिकारी-9689847171
अभिजीत बाबर -9922144259