बेस्ट बॉक्सर पुरस्कार- अनिता आहुजी
बेस्ट चॅलेंजर पुरस्कार-श्वेता पवार
बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर पुरस्कार-संचिती घोडके
पुणे- काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह २०२२” अंतर्गत आयोजित भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन भवानी पेठेतील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे बॉक्सिंग स्टेडियम पुणे, येथे आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धेत 128 महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदविला,
स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी मोहन जोशी, रमेश बागवे, छत्रपती पुरस्कार विजेते अंतर राष्ट्रीय बॉक्सर सलमान शेख, गौरव बोराडे, प्रशांत सुरसे, विठाल थोरात, दयानंद अडागले, सौ. सुरेखा खंडागळे, सुनील बावकर, मारुती कसबे, चेतन अगरवाल, मुन्नाभाई शेख, मदन वानी, विजय गुजर तसेच कान्होजी जेधे व इतर मान्यवर उपस्थित होते.
अशा स्पर्धेतून खेळाडूना आपल्या कौशल्य दाखवण्याची, व या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या क्रीडा संकुलात खेळण्याची संधी उपलब्ध होत असते, तसेच पुण्यातील अशा मध्यवर्ती भागात आजूबाजूला इतकी दाट लोकवस्ती, झोपडपट्टी , असताना इतके सुंदर क्रीडा संकुल उपलब्ध केले आहे, व ते टिकविले आहे याचा मला अभिमान आहे व त्यासाठी बागवे यांचे त्यांनी कौतुक केले.
तसेच या सप्ताह निमित्त उत्तम प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे येणाऱ्या काळात याचे अवोलोकन देशात होईल अशी अपेक्षा देखील डॉ. कदम यांनी व्यक्त केली. गेली १८ वर्ष हा उपाक्रम दर वर्षी अखंडित पणे चालू आहे व काय काय उपक्रम या सप्ताह मध्ये इतक्या वर्षात रभवले त्याची संशेकप्त मध्ये माहिती मोहन यांनी दिली, तसेच सोनियाजिंचा देशातील सर्वोच्च पदाचा त्याग हा आपण लक्षात ठेवून येणाऱ्या पिढीने त्याचे उधरहण घेवून आपली वाटचाल करावी ही विनंती देखील मोहन जोशी यांनी आपल्या भाषणात केली. आजच्या या तणावाच्या जीवन शैलीत युवकांनी, व नागरिकांनी आपल्या प्रकुर्तीची योग्य काळजी घ्यावी व या क्रीडा संकुलातील अनेक क्रीडा प्रकरापैकी कुटल्याही क्रीडा खेळ खेळून आपले आरोग्य जपावे असा सल्ला रमेशबागवे यांनी आपल्या भाषणात धीला.
यावेळी नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या भारत जोडो यात्रेत महत्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने रमेश बागवे व मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.विश्वजित कदम यांच्या पारितोषिके प्रदान करण्यात आली .
बेस्ट बॉक्सर पुरस्कार- अनिता आहुजी
बेस्ट चॅलेंजर पुरस्कार-श्वेता पवार
बेस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर पुरस्कार-संचिती घोडके यांनी मिळविला.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन व आयोजन माजी नगरसेवक,बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले, प्रास्ताविक सुनील बावकर यांनी केले तर आभार विठ्ठल थोरात यांनी मांडले.