मुंबई: सिटी इंडियाने सलग दुसऱ्या वर्षी अवतार व सेरामाउंटच्या अव्वल दहा बेस्ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया २०२२ (बीसीडब्ल्यूआय) यादीमध्ये स्थान मिळवले आहे. कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी मोस्ट इन्क्लुसिव्ह कंपनीज इंडेक्स (एमआयसीआय)च्या सर्वोच्च श्रेणीमध्ये (चॅम्पियन्स ऑफ इन्क्लुजन, हा पुरस्कार भारतातील दहा सर्वात सर्वसमावेशक कंपन्यांना दिला जातो) स्थान देण्यात आले आहे.
हा पुरस्कार सिटीच्या अधिक सर्वसमावेशक कार्यबल सुनिश्चित करण्यासाठीच्या दशकभराच्या प्रयत्नांना सन्मानित करतो, ज्यामध्ये दृढ धोरणे वैविध्यपूर्ण नियुक्तीला प्रोत्साहन देण्यासोबत कंपनीच्या कर्मचार्यांना प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. कर्मचार्यांना लैंगिक तटस्थता आणि विविध पार्श्वभूमीतील सहकार्यांचा आदर याविषयी संवेदनशील करण्यावर अथक लक्ष केंद्रित करण्याचे हे प्रमाणीकरण आहे.
साऊथ एशिया ऑपरेशन्स अॅण्ड टेक्नोलॉजी आणि सिटी सोल्यूशन्स सेंटर्स, इंडियाचे प्रमुख बालाजी नुथलपाडी म्हणाले, “या सन्मानामधून अधिक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कामाचे वातावरण तयार करण्यासाठी आम्ही केलेली प्रगती दिसून येते. वैविध्यपूर्ण प्रतिभा नियुक्त करणे, विकसित करणे आणि टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केल्याने आम्हाला अर्थपूर्ण व मूर्त परिणाम मिळाले आहेत. इक्विटी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमची धोरणे, फायदे आणि उपायांचा विस्तार करून एक पद्धतशीर दृष्टिकोन अवलंबला आहे. आमचे सहानुभूतीशील नेटवर्क आणि सतत संवेदनशीलतेच्या प्रयत्नांद्वारे कर्मचार्यांच्या सहभागाच्या माध्यमातून समावेशास प्रोत्साहन दिले जाते, जे एकत्रितपणे कामाचे वातावरण तयार करतात, जेथे प्रत्येक व्यक्तीला महत्त्व दिले जाते, त्यांचा आदर केला जातो आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतेसह योगदान देण्यास सक्षम केले जाते.’’
सिटी विविधता व समानतेला महत्त्व देते आणि लोक-केंद्रित उपक्रम व गुणवत्तेची संस्कृती यांच्याद्वारे समावेशनाला प्रोत्साहन देते. लिंग, लैंगिक अभिमुखता, वय किंवा शारीरिक क्षमता विचारात न घेता कार्यरत असलेले कर्मचारी व संभाव्य नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी अशा दोघांनाही निःपक्षपाती आणि समान वागणूक देणे त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. सिटी इंडियाला सलग दुसऱ्या वर्षी दोन्ही यादींमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. यामधून विविधता, समानता आणि समावेशात प्रगती करण्याच्या दृष्टीने कंपनीने केलेली महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येते.
गेल्या दशकभरात सिटी इंडियाने एलजीबीटीक्यू+च्या समावेशासंदर्भात प्रचंड प्रगती केली आहे, ज्यामध्ये सिटी इंडिया प्राइड नेटवर्कची स्थापना, वार्षिक व्हॉइस ऑफ द एम्प्लॉई सर्वेक्षणामध्ये लैंगिक अभिमुखता व लिंग ओळख यावरील लोकसंख्याशास्त्रीय प्रश्नांचा समावेश आहे आणि एलजीबीटीक्यू+ भागीदारांसह स्थानिक कर्मचारी भागीदारांपर्यंत कर्मचाऱ्यांचे लाभ पोहोचवले आहेत. यात लिंग, एलजीबीटीक्यू+, अपंगत्व आणि पिढ्या या चार प्रमुख स्तरांमध्ये आठ संवेदनशील नेटवर्क आहेत. हे नेटवर्क विविध पार्श्वभूमीतील सहकाऱ्यांच्या अद्वितीय गरजा पुरेशा प्रमाणात सादर केल्या जातील, याची खात्री घेतात.
सिटीची दर्जात्मक धोरणे, फायदे व मार्गदर्शकतत्त्वे आहेत, जसे गर्भवती व कामावर परतणाऱ्या मातांना सर्वांगीण पाठिंबा देण्यासाठी मॅटर्निटी मॅटर्स उपक्रमाचा भाग म्हणून मातृत्वानंतर परतणाऱ्या महिलांसाठी परफॉर्मन्स रेटिंग प्रोटेक्शन. चाइल्ड केअर लाभ व डे केअर सहयोग तरूण मातांना कामावर परत येण्यामध्ये मदत करतात. सिटीने १८० दिवसांच्या प्रसूती रजेची (काय़द्यानुसार अंमलात येण्यापूर्वी) अंमलबजावणी, पारदर्शकपणे खुलासा करणे आणि नुकसानभरपाईमधील लैंगिक पोकळी दूर करणे यामध्ये पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षी कंपनीने सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या विश्रांतीनंतर सिटीमध्ये सामील झालेल्या महिलांसाठी रिटर्न टू वर्क उपक्रम सुरू केला.
लैंगिक विविधता प्रतिनिधीत्व मेट्रिक्समध्ये सतत प्रगती करत सिटी इंडियाने गेल्या तीन वर्षांत एव्हीपी लेव्हलच्या वर श्रेणींमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ केली. कॅम्पसमध्ये भरती करणाऱ्यांपैकी जवळपास ५० टक्के तरुण महिला पदवीधर आहेत, तर २०२१ मध्ये जेंडर डायव्हर्सिटी हायरिंग ३८ टक्के होती.
भारतातील प्रमुख विविधता, समानता व सर्वसमावेशकता उपाययोजना कंपनी अवतारने युनायटेड स्टेट्समधील कामाच्या ठिकाणी विविधता, समानता व सर्वसमावेशकतेला प्रगत करण्याप्रती कटिबद्ध असलेली धोरणात्मक व्यावसायिक सेवा कंपनी ईएबीचा विभाग सेरामाउंटसोबत (पूर्वीची वर्किंग मदर मीडिया) सहयोगाने २०२२ मध्ये बेस्ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया (बीसीडब्ल्यूआय) स्टडीच्या सातव्या पर्वाचे आयोजन केले. या संशोधनाने मागील सहा पर्वांदरम्यान कॉर्पोरेट इंडियासाठी आयोजित केलेला सर्वात सखोल डायव्हर्सिटी अॅनालिटिक्स उपक्रम म्हणून स्वत:चे नाव स्थापित केले आहे. प्रत्येक संशोधन पर्वामध्ये ३०० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला, ज्यामधून टॉप १० व १०० बेस्ट कंपनीज फॉर विमेनची वर्णक्रमानुसार सूची तयार करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अवतार ग्रुपच्या संस्थापक व अध्यक्ष डॉ. सौंदर्या राजेश म्हणाल्या, “अवतारने सेरामाउंटसोबत (पूर्वीची वर्किंग मदर मीडिया) सहयोगाने देशामध्ये आयोजित केलेला सर्वात मोठा व सर्वात सर्वसमावेशक विविधता विश्लेषण उपक्रम बेस्ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया (बीसीडब्ल्यूआय)च्या ७व्या पर्वाच्या निकालांमधून भारतातील कंपन्यांचे वैविध्यपूर्ण कौशल्याप्रती असलेले अथक प्रयत्न दिसून येतात. या संशोधनाला सुरूवात झाल्यापासून महिला कर्मचारी सहभागामध्ये जवळपास १० टक्के वाढ झाली आहे, जे आता आशादायक ३४.८ टक्के आहे. बेस्ट कंपनीजमध्ये डीईआय प्रगतीची गती स्थिर आहे आणि त्यापैकी ७७ टक्के कपंन्यांनी कोविडनंतरच्या काळामध्ये त्यांच्या डीईआय गतीमध्ये वाढ केली आहे. या अशा कंपन्या आहेत, ज्यांनी त्यांच्या डीईआय प्रयत्नांमध्ये वाढीव कार्यसंचालन नफ्याद्वारे स्तर वाढवण्याचे फळ मिळवले आहे. या आदर्श कंपन्यांच्या डीईआय सर्वोत्तम पद्धती त्यांच्या अंतर्गत संस्कृतींच्या पलीकडे जात विक्रेते, सहयोगी, ग्राहक व समुदायाच्या परिसंस्थेपर्यंत पोहोचतील तेव्हा आपण एक असा समाज निर्माण करू, जेथे आपल्या भावी पिढ्या भरभराटीस येतील आणि यशस्वी होऊ शकतील.”