SHARAD LONKAR

58834 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

रस्ते अपघात व सुरक्षेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : गोपाळकृष्ण पिल्लई

सरहदतर्फे डॉ. योगेश म्हसे, विशाल नरवडे, जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान पुणे :  रस्त्यावरील अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असतानादेखील,देशभरात रस्त्यावर होणारे अपघात आणि रस्ते सुरक्षा या विषयांकडे गेल्या दोन दशकांपासून अक्षम्य दुर्लक्ष होत आले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव गोपाळकृष्ण पिल्लई यांनी केली. सरहद पुणेच्या वतीने डॉ.माधवगोडबोले स्मृती व्याख्यान आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनात उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान या विशेष कार्यक्रमाचे  टिळक स्मारक मंदिरयेथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘हरवलेले सुशासन’ या विषयावर पिल्लई बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर होते. या प्रसंगी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे, सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, डिजीपी कार्यालयातील प्रमुख लिपिक जहीरोद्दीन हुसेन शेख यांना स्व. माधव गोडबोले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरहदचे अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे होते. पिल्लई म्हणाले, रस्ते सुरक्षा हा इतका गंभीर विषय असतानादेखील गेल्या तीस वर्षांत एकाही खासदाराने त्यावर संसदेत चर्चा केलेली नाही. कारण त्यांच्यादृष्टीने रस्ते सुरक्षा हा मते मिळवून देणारा विषय नाही. त्यामुळे त्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. वस्तुतः दररोज नव्याने सहा हजार वाहने रस्त्यावर उतरत असतील, तर केवळ मोठे उड्डाणपूल बांधून किंवा मेट्रो तयार करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी व्यापक विचारमंथन होऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने हा विषय राजकीय दृष्टीक्षेपात कसा येईल, हे पुण्यातील सुजाण व विचारवंत लोकांनी पाहायला हवे. हा विषय अतिशय गंभीर असल्याने तो राज्यकर्त्यांच्या प्राधान्यक्रमावर यायला हवा. या विषयाचे स्वरूप इतके गंभीर झाले आहे की प्रशासन तरी कुठे-कुठे पुरे पडणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. २०४७ सालातील विकसित भारतहेलक्ष्य निर्धारित केले असून त्यासाठी अनेक चांगले प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत. परंतु ते राबवताना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचणे गरजेचे आहे. त्यातील मर्यादित पारदर्शकता दूर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिल्लई यांनी केले. इडीमध्ये काम करताना पूर्ण स्वातंत्र्य : विवेक वाडेकर आयकर आयुक्त विवेक वाडेकर म्हणाले, आजच्या स्थित्यंतराच्या काळात प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची आहे. इडी हा विषय आपल्याकडे खूप चर्चिला जात असला, तरी २०२३ सालापर्यंत या विभागामध्ये मी प्रत्यक्ष काम केले आहे. मी कार्यरत असेपर्यंत तरी एकदाही कुठल्याही राजकीय नेत्याने कधीही फोन करून दबाव आणला नाही किंवा काही करण्यास प्रवृत्त केले नाही. आम्हाला काम करताना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते; फक्त चांगल्या गुणात्मक कामाची अपेक्षा होती. त्यामुळे राष्ट्रउभारणी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच जबाबदारीने काम करायला हवे. आपल्यातील शासक हरवत आहे, ही आजची खरी अडचण आहे. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता : योगेश म्हसे.. सत्काराला उत्तर देताना योगेश म्हसे म्हणाले की, प्रशासनातील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान या पुरस्काराच्या रूपाने झाला आहे, असे मी मानतो. खरे प्रशासन म्हणजे तत्त्वनिष्ठता. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा पुरस्कार अधिक लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्णय दृढ करेल, असा विश्वास मला वाटतो. जबाबदारी नागरिकांचीही : विशाल नरवडे.. विशाल नरवडे म्हणाले, सुशासनात जनता सर्वात महत्त्वाची आहे. हरवलेल्या सुशासनाला आपल्यालाच जिवंत करावे लागणार आहे. अधिकारी आणि प्रशासनाची जशी जबाबदारी आहे, तशीच जबाबदारी जागरूक नागरिकांचीही आहे. मेहनत आणि सातत्य महत्त्वाचे : जहीरोद्दीन हुसेन शेख.. जहीरोद्दीन हुसेन शेख म्हणाले, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. मेहनत आणि सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशा कामांना ईश्वराचाही आशीर्वाद लाभतो आणि ती यशस्वी होतात. इव्हेंट नव्हे मुव्हमेंट : संजय नहार प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, डॉ.माधव गोडबोले हे नाव प्रशासनात अतिशय आदराने घेतले जात होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त प्रशासनातील उत्तम व्यक्तींचा गौरव आणि हरवलेल्या सुशासनाविषयी विचारमंथन करण्याचा विचार आम्ही केला. हा केवळ इव्हेंट नसून ती एक मुव्हमेंट आहे. ही एक चांगुलपणाची चळवळ आहे. त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळावी, अशी आमची इच्छा आहे.

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात:उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक, दि. 14 : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील....

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने आयोजित ४४ व्या फळे, फुले आणि भाजीपाला स्पर्धा व प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन आज छत्रपती...

टाटा एआयएने आणले ‘एन्हान्स्ड व्हॅल्यू इंडेक्स फंड्स’

प्रियजनांची सुरक्षा आणि भविष्यातील प्रगती: गुंतवणुकीचा सर्वात स्मार्ट मार्ग हा नवीन फंड लार्ज, मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांच्या संतुलित मिश्रणासह इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणुकीची संधी देतो.टाटा एआयएच्या...

रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सव दि. २० फेब्रुवारीपासून

धायरीत आयोजन : पंडित सत्यशील देशपांडे यांना ब्रह्मनाद पुरस्कार पुणे : ब्रह्मनाद कला मंडळ व धारेश्र्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी (२५वा) ब्रह्मनाद संगीत...

Breaking

मोशी दुर्घटनेप्रकरणी महापालिकेचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता निलंबित

नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर जबाबदारी निश्चित; विभागीय चौकशीचे आदेश, १५...

पुणे पासपोर्ट कार्यालय आणि पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी

पुणे -पुण्यातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि स्टेशन...

पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरापेक्षा कौशल्य विकास आवश्यक -महापौर मंजुषा नागपुरे 

क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी व निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ३...

पीपीएस मोटर्सचा पुण्यात विस्तार; कॅम्पमध्ये महिंद्राचे नवे अत्याधुनिक शोरूम सुरू

ईस्ट स्ट्रीटवरील नव्या टचपॉइंटमुळे पुण्यातील महिंद्रा सुविधा केंद्रांची संख्या...
spot_imgspot_img