SHARAD LONKAR

56225 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात: अक्कलकोटला निघालेल्या 5 मित्रांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये...

इतिहासात जिन्ना–हिंदू महासभेची युती:भाजप-एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू; दोघांची नैसर्गिक युती महाराष्ट्रासाठी घातक- हर्षवर्धन सपकाळ

मुंबई-महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे...

गुरू षष्ट्यब्दपूर्तीचा हृद्य सोहळा

संगीत घराण्याचे सौदर्यमूल्य अभ्यासणे, जपणे महत्त्वाचे : पंडित सत्यशील देशपांडे पंडित धनंजय खरवंडीकर, विदुषी कविता खरवंडीकर यांचा षष्ट्यब्दीनिमित्त गौरव सोहळा पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्व घराण्यांची सौंदर्यमूल्ये अभ्यासणे व जपणे महत्त्वाचे आहे. गुरूंच्या सहवासाने जीवन सूरमयी व आनंदी होते. धनंजय व कविता खरवंडीकर यांच्याशी शास्त्रीय संगीताविषयी होणारा संवाद या हृदयीचे त्या हृदयी असे हितगुज ठरते, असे मत ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पंडित सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ तबलावादक व संगीतकार पंडित धनंजय खरवंडीकर आणि आग्रा घराण्याच्या  गायिका विदुषी कविता खरवंडीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंडित सत्यशील देशपांडे बोलत होते. ज्येष्ठ तबलावादक पंडित ओंकार गुलवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्परूप संस्थेच्या संचालिका व विदुषी खरवंडीकर यांच्या शिष्या धरित्री जोशी-बापट यांनी  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम एसएनडीटी सभागृहात झाला. पंडित धनंजय खरवंडीकर यांचा सत्कार पंडित ओंकार गुलवडी तर विदुषी कविता खरवंडीकर यांचा सत्कार पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी शिष्यांच्या हस्ते खरवंडीकर दाम्पत्याचे गुरुपूजन झाले. रागसंगीत व बंदिशींविषयी आजच्या काळात आस्था कमी प्रमाणात जाणवते असे निरीक्षण नोंदवून पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, अशा काळात कविता खरवंडीकर यांना बंदिशींमधील मर्म जाणून घेण्याची ओढ आहे आणि या विषयी त्या सखोल चिंतनही करीत आहेत. धनंजय यांचे वादन उपज अंगाचे असून तालाचे व गायनाचे सौंदर्य वाढविणारे असते. पंडित ओंकार गुलवडी म्हणाले, गुरू व शिष्याचे नाते जन्मोजन्मीचे असते. गुरूचे प्रेम व आशीर्वाद मिळणे हे शिष्यासाठी उर्जादायी असते. कला क्षेत्रात धनंजय व कविता यांचे योगदान मोठे आहे. धनंजय यांच्या तबला वादनातील रचना या पारंपरिक असल्या तरी त्यात नाविन्यपूर्णता जाणवते. सत्काराविषयी बोलताना पंडित धनंयज खरवंडीकर म्हणाले, गुरूंचे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. गुरूंचे आशीर्वाद व मार्गदर्शनानेच आम्ही घडत गेलो. आमच्या हातून या क्षेत्रात अजूनही भरीव कार्य घडावे अशी इच्छा आहे. कविता खरवंडीकर म्हणल्या, गुरूंनी भरभरून दिलेल्या ज्ञानाविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. गुरू हा शिष्याला घडवत असताना स्वत:ही घडत असतो कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी कविता खरवंडीकर यांची गायन मैफल रंगली. मैफलीची सुरुवात राग केदारमधील ‘बहुत गई, थोडी रही’ या बडा ख्यालने केली. त्यानंतर मध्यलय तीन तालातील ‘कंगनवा मोरा अत ही अमोला’ ही रचना सादर करून द्रुत एकतालातील ‘ए नवेली नार’ ही रचना ऐकविली. त्यानंतर राग नट बिहागमधील ‘कैसे कैसे बोलत मोसे लोगवा’ या रचनेला जोडून द्रुत तीन तालातील ‘झन झन झन पायल बाजे’ ही रचना प्रभावीपणे सादर केली. मैफलीची सांगता मिश्र तिलंगमधील ‘सावरिया तोपे वारी’ या ठुमरीने केली. मधुर आवाज, शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि भावपूर्ण सादरीकरणातून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित धनंजय खरवंडीकर (तबला), पंडित उदय कुलकर्णी (संवादिनी), धरित्री जोशी-बापट, श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली. प्रास्ताविकात  धरित्री जोशी बापट यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आरती पटवर्धन यांनी केले तर आभार अनघा देशपांडे यांनी मानले. कलाकारांचा सत्कार दिप्ती जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

पहिला वन जैवविविधता महोत्सव पणजीत उत्साहात सुरू

‘गोवा बियॉन्ड बीचेस’ संकल्पनेतून जंगले, वन्यजीव व पारंपरिक ज्ञानाचा गौरव पणजी : पहिला वन जैवविविधता महोत्सव आज पणजी येथील आर्ट पार्कमध्ये सुरू झाला. गोवा वन...

कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, खपवून घेणार नाही,पक्षाचे ऐका – CM फडणवीसांची निवडून आलेल्या नगरसेवकांना तंबी

पारदर्शी कारभार करत पुणे सर्वोत्तम पालिका बनवा-मुख्यमंत्री फडणवीस यांची नवनिर्वाचित नगरसेवकांकडून अपेक्षा पुणे, “महापालिका हा सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा उपक्रम आहे. महापालिका हा आपला व्यवसाय, कमिशनचा...

Breaking

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेस भवनवर मोर्चा आणला त्यांनी ,चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना...

आंतरराज्यीय टोळी पकडून सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त.

पुणे : खराडी येथे अमली पदार्थासह पकडलेल्या दोन...
spot_imgspot_img