अशोक सिंघल यांचे भाऊ अरविंद सिंघल यांनी राम मंदिरासाठी दिले 11 कोटी रुपये

Date:

उदयपूर-अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भगवान श्री रामांच्या भव्य मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. सर्वात मोठे दान उदयपूरच्या अरविंद सिंघल यांनी दिले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांचे लहान भाऊ अरविंद सिंघल यांनी मंदिर निर्माणासाठी 11 कोटी रुपये दिेले आहेत. यावेळी ते म्हणाले की, मोठ्या भावाचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे.

अरविंद सिंघल यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये दान जमा करीत असलेले पारस सिंघवी यांच्याकडे दोन वेळा चेकच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी 5 कोटी आणि नंतर 6 कोटी रुपयांचा चेक दिला. अरविंद सिंघल वॉलकॅन इंडिया प्रायवेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. वॉलकॅन इंडिया प्रायवेट लिमिटेड मायनिंग क्षेत्रासोबतच विजेचे मीटर आणि उपकरण बनवणारी कंपनी आहे.

मंदिराच्या भूमी पूजनादरम्यान उपस्थित होते सिंघल

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमात देशातील निवडत लोकांना आमंत्रण दिले होते. यात अरविंद सिंघल यांनाही बोलवण्यात आले होते, पण आजारी असल्यामुळे ते गेले नव्हते. त्यांच्या जागी त्यांचे पुतणे सलिल सिंघल आणि त्यांची पत्नी गेले होते. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले विनाशकारी वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा, सरकारच्या...

‘महाराष्ट्रातील उच्चशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले’; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांचा दावा

‘हा संवैधानिक लोकशाहीच्या रक्षणार्थ देशव्यापी संदेश’; शिक्षक-पदवीधर निवडणुका मतपत्रिकेवरच...

‘आमच्याकडेही मोठा शब्दकोश; पण दोस्तीत कुस्ती नको!’ आनंद परांजपेंचा भाजपला इशारा

धंगेकरांना ‘माकडछाप’ म्हटल्यावरून शिवसेना आक्रमक; मित्रपक्षांवरील टीका थांबवण्याची मागणी,...