अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत ऍक्वा रायडर्स संघाला विजेतेपद

Date:

पुणे, 24 एप्रिल 2022 – डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत अंतिम फेरीत साहिल गोवित्रीकर(19धावा) व पार्थ चिवटे(2-5) यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर ऍक्वा रायडर्स संघाने स्नो लेपर्ड्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना स्नो लेपर्ड्स संघाने 6षटकात 5बाद 45धावाचे आव्हान उभे केले. यात सौरभ दाते 16, रोहित बर्वे 13, रोहन पटवर्धन 8 यांनी छोटी पण महत्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. ऍक्वा रायडर्स संघाकडून पार्थ चिवटे(2-5), तेज दीक्षित(1-11) यांनी सुरेख गोलंदाजी केली. 

याच्या उत्तरात ऍक्वा रायडर्स संघाने 4.2षटकात 1बाद 47धावा करून पूर्ण केले. यामध्ये साहिल गोवित्रीकर 19, शैलेश बांगले नाबाद 18, तेज दीक्षित नाबाद 7 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी साहिल गोवित्रीकर ठरला.

स्पर्धेतील विजेत्या ऍक्वा रायडर्स संघाला अनिल रानडे स्मृती चषक व पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, डॉ.आनंद भूषण रानडे, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, विश्वेश कटक्कर, एमसीएचे सचिव रियाज बागवान, कोटक बँकचे ओंकार जलादी आदी मान्यवर उपस्थित होते. मुकुंद जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: अंतिम फेरी:स्नो लेपर्ड्स: 6षटकात 5बाद 45धावा(सौरभ दाते 16(9,1×4), रोहित बर्वे 13(10,2×4), रोहन पटवर्धन 8, पार्थ चिवटे 2-5, तेज दीक्षित 1-11)पराभूत वि.ऍक्वा रायडर्स: 4.2षटकात 1बाद 47धावा(साहिल गोवित्रीकर 19(10,3×4), शैलेश बांगले नाबाद 18(12,2×4), तेज दीक्षित नाबाद 7, सचिन गोडबोले 1-18);सामनावीर-साहिल गोवित्रीकर;ऍक्वा रायडर्स संघ 7 गडी राखून विजयी.

इतर पारितोषिके:सर्वोत्कृष्ट फलंदाज: नहूश जाधव(124धावा, रोहन स्ट्रायकर्स);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: तेज दीक्षित(6 विकेट)
मालिकावीर: साहिल गोवित्रीकर(102धावा, 4विकेट)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे – सौ. मंजुश्री खर्डेकर.

नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात अध्यक्ष...

किमान ८ कोटीची उलाढाल असलेले केबलवाले आणि होर्डिंग वाले यांच्यासाठी स्थायी विरोधात लढायला ‘फौज’ तय्यार

कोट्ट्याधीशांच्या व्यवसायाला शिस्त लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवू पाहणाऱ्या निर्णयांना...

मॅट्रोमोनिअलवरून वधू शोधणाऱ्या इस्त्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक

पुणे- मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलांची फसवणूक...