सिंहगडरस्त्यावर उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची आर्थिक तरतूद करायला मंजुरी

Date:

प्राण्यांना भूल देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून लस मागविण्यात येणार

पुणे -महापालिकेच्या स्थायी समितीने सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाच्या कामासाठी १३५ कोटींची आर्थिक तरतूद करायला मंजुरी दिली आहे.तसेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना भूल देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून लस मागविण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल बांधण्यासाठी . २०१८-१९ मध्ये महापालिकेने १० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर महापालिकेकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या सल्लागारां कडून प्राप्त झालेल्या ४ पर्यायांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे सूचवण्यात आले होते. यापैकी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर पर्यंत हा उड्डाणपूल बांधला जाणार आहे.

या कामासाठी १९-२० मध्ये ३० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.पण लॉकडाऊन मुळे या प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.यासाठी लागणारी १३५ कोटींची तरतूद टप्प्या टप्प्याने उपलब्ध करायला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे.

महापालिकेकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना भूल देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून लस मागविण्यात येणार आहे. हे डोस आयात करण्यास महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी सव्वा लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात ६२ प्रजातीचे सुमारे ४२५ वन्यप्राणी असून यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यांचा समावेश होतो. विविध प्रजातींच्या प्राण्यांना वेळोवेळी आजाराचे निदान करणेसाठी विविध चाचण्या, उपचार करणे, एका खंदकातून दुसरीकडे प्राणी स्थलांतरीत करणे, इतर प्राणीसंग्रहालयासमवेत प्राणी अदलाबदल करणे इत्यादीसाठी भूल द्यावी लागते. बधिरीकरण प्रक्रियेसाठी विशिष्ट ड्रग्जचा प्रजातीनिहाय वापर केला जातो. Xylazine व Ketamine ड्रग्ज बहुतांश प्रजातीत परिणामकारक असलेने मोठ्या प्रमाणावर या ड्रग्जचा वापर आजतागायत करणेत आलेला आहे.

तथापी काही प्रजाती जसे कि गवा व हत्ती या प्रजातीत या ड्रग्जचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. तथापी या दोन प्रजातीतील प्राणी प्राणीसंग्रहालयात आहेत. यास्तव अशा प्रजातीतील प्राण्यांना बधिरीकरण करणेसाठी ‘नार्कोटीक’ वर्गातील Etorphine Hydrochloride या ड्रग्जचा वापर करावा लागतो. हे ड्रग सद्यस्थितीत राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाकडे उपलब्ध नाही. भारतात हे ड्रग उपलब्ध नसलेने आजतागायत ते खरेदी करणेत आले नाही. अलिकडच्या काळात प्राणीसंग्रहालयातील आजारी गव्यावर उपचार करणेकरिता अन्य राज्यातून हे ड्रग मागविणेत आले होते. तथापी ती सहजासहजी उपलब्ध होऊ शकली नाही.

गवा व हत्ती यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रजातींना बधिरीकरण प्रक्रियेसाठी Etorphine Hydrochloride व या ड्रगचे अॅन्टीगोनीस्ट Diprinorphine Hydrochloride व Naltrexone Hydrochloride ही तीन प्रकारातील औषधे आवश्यक तेवढ्या मात्रेत खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. ही औषधे भारतात कोठेही उपलब्ध नाहीत. या औषधांच्या उपलब्धेबाबत भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांचेकडून माहिती घेतली असता ‘वाईल्डलाईफ फार्मास्युटीकल्स’ दक्षिण आफ्रिका यांचेकडून या ड्रग्जचा पुरवठा केला जाऊ शकतो याबाबत माहिती प्राप्त झालेली आहे.

‘वाईल्डलाईफ फार्मास्युटीकल्स’ दक्षिण आफ्रिका यांचेकडे ई-मेलद्वारे संपर्क करून या औषधांच्या खरेदीबाबत विचारणा करून खरेदी प्रक्रियेची इंत्यभूत माहिती प्राप्त केलेली आहे. कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार आयात प्रक्रियेतील सर्व परवानग्या व सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर त्यांना अगोदर औषधांचे देयक अदा करावे लागणार आहे व त्यानंतर मालाची पोहोच केली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...