नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत

Date:

पुणे, दि. २७:- महिला सक्षमीकरण कार्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती पुरस्कार-२०२१’ साठी पात्र महिला आणि संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईनरित्या अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांना सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेण्याच्या उद्देशाने प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच भारतीय युवक-युवतींना समाज व राष्ट्र निर्माण यामध्ये महिलांच्या योगदानाचे महत्त्व समजण्यासाठी नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. विशेषत: दुर्बल घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना आणि सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्कारासाठी इच्छुक पात्र महिला व सामाजिक संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह ३१ जानेवारी २०२२ पर्यंत www.wcd.nic.in किंवा www.awards.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. पुरस्काराचे स्वरुप दोन लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.

पुरस्कारासाठी महिला व सामाजिक संस्थानी अर्ज करावेत. वैयक्तिक पुरस्कारासाठी महिलांचे वय १ जुलै २०२१ रोजी वय २५ वर्षे पूर्ण झालेले असावे. एखादी सामाजिक संस्था अर्ज करु इच्छित असेल तर महिलांसाठी आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये ५ वर्ष कामाचा अनुभव आवश्यक राहील. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या महिलांनी किंवा सामाजिक संस्थांना अर्ज करता येणार नाही.

महिलांसाठी सर्वसाधारण परीस्थितीमध्ये आर्थिक सामाजिक सक्षमीकरणाठी संबंधित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या महिलांना व सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी महिलांना निर्णायक भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेले असावे, पारंपारिक व अपारंपरिक क्षेत्रामध्ये महिलांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिलेले असावे. ग्रामीण महिलांना मुलभुत सेवा पुरविण्याच्या उददेशाने कार्य केलेले असावे. महिलांना विज्ञान, औद्योगिक, खेळ, कला, संस्कृती, आरोग्य व स्वास्थ शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण प्रोत्साहित केलेले असावे आदी पात्रता व निकष पुरस्कारासाठी आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी कळविले आहे.
**

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा

जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी पुणे, दि. १६:...

लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील-मुख्यमंत्री देवेंद्र...

फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना...

ओव्हरहेड केबल,अनधिकृत होर्डींग्ज प्रकरणी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या बेफिकिरीचा झाला पर्दाफाश

ओव्हरहेड केबल भूमिगत करण्यासाठी नियमावली करण्यास प्रशासनाला १० दिवसांची...