महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Date:

पुणे दि.6: वीरशैव- लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी २० एप्रिल २०२२ पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत यासाठी व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पुरस्कारासाठी पात्रतेबाबतची नियमावली ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे. राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संबंधित शासन निर्णय असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१९०३०८२०३९००३५२२ असा आहे.

२०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या चार वर्षाचे पुरस्कार प्रस्ताव एकत्रित घेण्यात येणार असल्याने इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या चार वर्षासाठी चार वेगवेगळे अर्ज करावेत. अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक व योग्य ती माहीती जोडावी असे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...