मुंबई-वरळी कोळीवाडा समुद्रकिनार्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. वरळी गावात भारतीय तट रक्षकांच्या अगदी समोर स्थित कोस्टलाईन, व्यापक कचरा डंपिंगच्या मुद्द्यांवर त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता होती. कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ती रुबल नागी यांनी तिच्या मिसाल मुंबई उपक्रमाचा एक भाग म्हणून मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिन अहिर आणि संगीता अहिर यांच्या सहकार्याने या क्षेत्रातील कोळी मच्छिमारांच्या जीवनात बदल आणि सुशोभिकता आणण्यासाठी प्रयत्न केले.
मिसाल मुंबई उपक्रमासाठी रूबल नागी धारावी, बॅन्डस्टँड, कफ परेड आणि कुलाबा झोपडपट्टीत रंगकाम आणि पुनर्रचना प्रकल्पांमध्येही कार्यरत आहेत. यावेळी या उपक्रमा अंतर्गत वरळी कोळीवाडा येथील झोपडपट्यांना नवीन रंग देऊन त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे, ज्यामुळे पावसाच्या पाण्याने घरांमध्ये पाणी गळती होणार नाही, याची खात्री करून घेण्यात आलेली आहे. नुकतेच मुंबईच्या अभिमानी कफ परेडमधील धोबी घाटाला सुंदर बनण्यासाठीचे शिवधनुष्य रूबल नेगी आर्ट फाऊंडेशनने हाती उचलले आहे.
वरळी कोळीवाडा समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेसंदर्भात रुबल नागी यांना विचारले असता त्या म्हणतात की, “मिसाल मुंबई उपक्रमाद्वारे आम्ही मच्छिमारांना स्वच्छ आणि आरोग्यदायी किनारपट्टीची हमी देऊ इच्छितो आणि त्याच बरोबर त्यांच्या आजूबाजूचा परिसर सुंदर आणि प्रसन्न बनविण्यासाठी त्यांना मदत करतो आहोत. वरळी कोळीवाडा परिसरातील नागरिकांसाठी आम्ही उचललेलं हे एक छोटंसं पाऊल आहे. वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांसाठी पुढे सरसावलेला हा मदतीचा हात मुंबईकर म्हणून, आपल्यापैकी प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
“रूबल नेगी एक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मिसाल मुंबई या उपक्रमाद्वारे पुढाकार घेत आहेत. वरळी कोळीवाडा झोपडपट्टीचे नूतनीकरण आणि पेंटिंग याद्वारे मुंबई शहराला रुबलने दिलेली एक नवीन छटा आपल्याला पुन्हा नव्याने मुंबईच्या प्रेमात पाडते. रूबलने या प्रकल्पाला जणू एक रिक्त कॅन्व्हास म्हणून बघितले आणि त्यामध्ये सर्जनशील रंगाचे श्वास फुंकले आहेत. या उपक्रमात रुबल आणि माझी पत्नी संगीता अहिर यांनी नागरिक चळवळीचा पुढाकार घेतला आहे. पुढे जाऊन बीएमसी, नौदलातील कामगार, पोद्दार शाळेतील विद्यार्थी, डॉक्टर आणि वकीलही या उपक्रमासाठी हात पुढे करतील.” असे सचिन अहिर म्हणाले.