पुणे- दिनांक 13/08/22 ते दिनांक 15/08/22 याकालावधीत ” हर घर, तिरंगा ” या शासकीय उपक्रमाला प्रतिसाद देत श्री.दशानेमा गुजराथी समाजातील विविध संस्थांनी, ज्ञातिबांधवांनी देश, विदेशात आप आपल्या घरावर ” तिरंगा ध्वज ” सन्मानपूर्वक फडकवून या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला.
श्री.विद्या उत्तेजक ट्रस्ट या, संस्थेच्या पुण्यातील कर्वे रस्त्यावरील मुलींच्या वसतिगृहात अध्यक्ष अनिल गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या नंतर विविध वक्त्यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त,आपल्या देशाला, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिले,त्या ऐतिहासिक घटनांना आपल्या भाषणात उजाळा देऊन,महान स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. विश्वस्त कांतीलाल शहा,पदाधिकारी प्रणव शेठ, विठ्ठल मेहता, सौ.संगिता शेठ,सौ.स्वाती धारीया,माजी अध्यक्ष विजयकुमार शेठ.व कार्यकारिणी सदस्य :- श्री.सिध्दार्थ देसाई, सौ.माधुरी बुटाला.
संस्थेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे श्री.पाडुरंग शिंदे,सौ.गिता अट्टल ई.मान्यवर या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले होते.
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे, औचित्य साधून “हर घर, तिरंगा ” या शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून ” ट्रस्टच्या वतीने ” वाटप करण्यात आलेल्या “राष्ट्रध्वजाचा ” उपस्थितांनी सन्मानपुर्वक स्विकार केल्यावर,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.