दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अँबिशियस क्रिकेट अकादमी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघांचे विजय

Date:

पुणे, 24ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात अँबिशियस क्रिकेट अकादमी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब या संघानी अनुक्रमे पीवायसी हिंदू जिमखाना व क्लब ऑफ महाराष्ट्र संघांचा पराभव केला. 


पूना क्लब क्रिकेट मैदानावर झालेल्या लढतीत तनिश जैन(3-32 व 48धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा  7 गडी राखून पराभव करत आपली विजयाची मालिका कायम ठेवली. प्रथम फलंदाजी करताना अँबिशियस क्रिकेट अकादमीच्या नरेंद्र पाटील(3-30), तनिश जैन(3-32), तनय सांघवी(1-22) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 43षटकात सर्वबाद 168 धावावर आटोपला. यात श्रेयश वाळेकर 59, नचिकेत वेर्लेकर 34, तेजस तोलसनकर 17, साहिल छुरी 16, अमेय भावे 13,  यांनी धावा केल्या. हे आव्हान अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 26.5षटकात 3गड्यांच्या बदल्यात 169धावा करून पूर्ण केले. यात तनिश जैन 48, सिद्धांत दोशी 40, अनिकेत पोरवाल नाबाद 23, ऋषिकेश राऊत नाबाद 19 यांनी धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 
दुसऱ्या ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात  आनंद ठेंगे 5-26)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा  8 गडी राखून पराभव केला. स्पर्धेत अ गटातून अँबिशियस क्रिकेट अकादमी, केडन्स क्रिकेट अकादमी या संघानी तर, ब गटातून व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, डेक्कन जिमखाना संघाने नेटरनरेट सरासरीच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:पीवायसी हिंदू जिमखाना: 43षटकात सर्वबाद 168 धावा(श्रेयश वाळेकर 59(87,6×4), नचिकेत वेर्लेकर 34(36,3×4,1×6), तेजस तोलसनकर 17, साहिल छुरी 16, अमेय भावे 13, नरेंद्र पाटील 3-30, तनिश जैन 3-32, तनय सांघवी 1-22) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: 26.5षटकात 3बाद 169धावा(तनिश जैन 48(58,6×4,1×6), सिद्धांत दोशी 40(50,6×4), अनिकेत पोरवाल नाबाद 23(26), ऋषिकेश राऊत नाबाद 19, साहिल छुरी 1-45, रोहित जना 1-15);सामनावीर-तनिश जैन; अँबिशियस क्रिकेट अकादमी संघ 7 गडी राखून विजयी; 
क्लब ऑफ महाराष्ट्र: 16.4षटकात सर्वबाद 73 धावा(अतुल विटकर 34(25,5×4,1×6), राजवर्धन उंडरे 14, आनंद ठेंगे 5-26, सुदीप पाठक 2-35, रौनक राठी 3-12) पराभूत वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 10.1षटकात 2बाद 77धावा(ऋतुराज धुलगुडे 29(21,4×4,1×6), संदीप शिंदे नाबाद 29(24,1×4,3×6), अभिमन्यू जाधव नाबाद 14, संकेत चव्हाण 2-27);सामनावीर-आनंद ठेंगे; युनायटेड स्पोर्ट्स क्लब 8 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजकारण कमी करा अन विकास कामांवर जास्त लक्ष द्या:मंत्री माधुरी मिसाळांनी महापलिकेच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे दिले आदेश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा...

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व...

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील...

भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का ?- अरविंद शिंदेंचा सवाल

पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल...