अनिकेत पोरवालची अफलातून फलंदाजी; नरेंद्र पाटील व वैभव विभुते यांची सुरेख गोलंदाजी

Date:

पुणे, 29 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या सुपरलीग फेरीत अ गटात नरेंद्र पाटील(3-32), वैभव विभुते(3-26) यांच्या सुरेख गोलंदाजीसह अनिकेत पोरवालच्या 91 धावांच्या खेळीच्या जोरावर अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या या शेवटच्या सुपरलीग फेरीच्या सामन्यात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व तो त्यांच्या गोलंदाजांनी अचूक ठरविला. अँबिशियस क्रिकेट अकादमीच्या नरेंद्र पाटील(3-32), वैभव विभुते(3-26), व्यंकटेश दराडे(2-26), तनिश जैन(1-19), सचिन भोसले (1-26)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा डाव अवघ्या 33षटकात 134 धावावर संपुष्टात आला. वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे व्हेरॉक संघ 15.2 षटकात 7 बाद 82 असा अडचणीत आला. त्यानंतर किरण मोरे(41धावा) व  मनोज यादव(16धावा) यांनी आठव्या गड्यासाठी 70 चेंडूत 29धावांची भागीदारी करून थोडासा प्रतिकार केला. 
134धावांचे आव्हान अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 20षटकात 2बाद 135धावा  करून पूर्ण केले.  यात अनिकेत पोरवालने 61 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 91धावा काढून संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अनिकेतला सिद्धांत दोशीने 56 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 111 चेंडूत 132 धावांची भागीदारी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. 
अ गटात अँबिशियस, व्हेरॉक आणि क्लब ऑफ महाराष्ट्र या संघानी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यामुळे अंतिम फेरीस पात्र ठरण्यासाठी अंबिशियस क्रिकेट अकादमी संघाला हे आव्हान 34 षटकात पूर्ण करणे गरजेचे होते व हे आव्हान त्यांनी 20 षटकात पूर्ण केले. तसेच अ गटात अँबिशियस क्रिकेट अकादमी संघाने 1.1311 नेट रनरेट सरासरीच्या जोरावर अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली.  
स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 31 जानेवारी रोजी केडन्स क्रिकेट अकादमी विरुद्ध अँबिशियस क्रिकेट अकादमी यांच्यात पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर होणार आहे.  
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सुपरलीग फेरी:व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 33षटकात सर्वबाद 134 धावा(किरण मोरे 41(80,3×4,1×6),मिझान सय्यद 23(30,1×4,2×6), ओम भोसले 18(19), मनोज यादव 16, पवन शहा 12, नरेंद्र पाटील 3-32, वैभव विभुते 3-26, व्यंकटेश दराडे 2-26, तनिश जैन 1-19, सचिन भोसले 1-26) पराभूत वि.अँबिशियस क्रिकेट अकादमी: अंबिशियस क्रिकेट अकादमी: 20षटकात 2बाद 135धावा(अनिकेत पोरवाल 91(61,11×4,5×6), सिद्धांत दोशी नाबाद 40(56, 5×4, 1×6), कपिल गायकवाड 1-31,  अॅलन रोडरिगेस 1-34); सामनावीर-अनिकेत पोरवाल; अंबिशियस क्रिकेट अकादमी 8 गडी राखून विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोट्यवधींची पाण्याची टाकी बांधली; तरीही नागरिकांच्या नळाला पाणी नाही? मनसेचा सवाल!

अप्पर येथील स्टील यार्ड परिसरातील पाण्याची टाकी तातडीने सुरू...

कोजागिरी पौर्णिमेला उद्यानांत घ्या चांदण्यांचा आनंद! रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत उद्याने खुली

पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाचा विशेष निर्णय; शहरातील २१६ उद्यानांच्या...

पुण्याच्या पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि पावसाळी निचऱ्यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य घेणार ?

जागतिक बँक समूहाच्या वरिष्ठ शिष्टमंडळाची पुणे महापालिकेला भेट; आयुक्त...

पुण्यात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आवाजाचे फटाके फोडण्यास बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांचे निर्देश; १२५ डेसिबलपेक्षा अधिक...