अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप बॅडमिंटन स्पर्धा ; हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : हवेली तालुका बॅडमिंटन संघटना (एचटीबीए) आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १३ व्या अमनोरा-पीवायसी एचटीबीए करंडक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विनीत कांबळे, ओजल रजक यांनी अनुक्रमे पुरुष एकेरी आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी आयर्न मॅन कौस्तुभ राडकर, पीडीएमबीएचे अध्य़क्ष अनिरुद्ध देशपांडे, पीवायसी क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव, स्पर्धेचे संयोजन सचिव उदय साने, कॉर्पोरेट अॅथलीटचे अभिजीत चांदगुडे, परबत कुंभार उपस्थित होते. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या अनन्या गाडगीळ हिला ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती यावेळी देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना ३ लाख रुपयांची पारितोषिके, करंडक, प्रशस्तीपत्रक देण्यात आली.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित विनीत कांबळेने दुस-या मानांकित चिराग भगतवर १५-११, १५-१० अशी २३ मिनिटांत मात केली आणि विजेतेपद पटकावले. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित ओजल रजकने अस्मित शेडगेवर १५-९, १५-८ अशी २३ मिनिटांत सहज मात केली.
निकाल– अंतिम फेरी- पुरुष दुहेरी- जयराज शकतवत – नरेंद्र गोगावले वि. वि. सोहम नवंदर – वेंकटेश अगरवाल१५-११, १५-११. उपांत्य फेरी – सोहम नवंदर – वेंकटेश अगरवाल वि. वि. रोहन जाधव –सुधांशू मेडसिकर १५-१२, १५-१३, जयराज शकतवत – नरेंद्र गोगावले वि. वि. अनिकेत बांडगर – प्रतीक धर्माधिकारी १३-१५, १५-८, १५-१२.
महिला दुहेरी – अंतिम फेरी – अदिती काळे-रिया कुंजीर वि. वि. सानिया तापकीर – योगिता साळवे १५-९, १६-१४, सानिया तापकीर – योगिता साळवे वि. वि. खुशी सुवर्णा – सई नांदुरकर १५-१०, १५-१३, अदिती काळे – रिया कुंजीर वि. वि. अदिती रोडे – लीना ढापरे१५-१३, १५-१०. मिश्र दुहेरी – नरेंद्र पाटील – सानिया तापकीर वि. वि. अजित कुंभार – रिया कुंजीर १५-१०,१५-५.उपांत्य फेरी – अजित कुंभार – रिया कुंजीर वि. वि. सोहम नवंदर – सारिका गोखले १५-७,१५-९, नरेंद्र पाटील – सानिया तापकीर वि. वि. नरेंद्र गोगावले – अदिती गावडे १५-११, १५-११.