पुणे :
नागरिकांनी नेहमीप्रमाणे निष्काळजीपणा दाखवला तर तो तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरु शकतो. या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचा निर्णय आज जाहीर केला आहे.पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
- दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७
- हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० (पार्सल रात्री ११ पर्यंत)
- अत्यावश्यक सुविधा वगळता इतर दुकाने शनिवारी ,रविवारी बंद
- संचारबंदी रात्री १० पासून
- उद्याने सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७
- Outdoor स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ , संध्याकाळी ५ ते ७
- अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत
- राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी
- लेव्हल५ असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक
- शासकीय कार्यलये १०० टक्के क्षमतेने सूरु
- खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू