मुंबई -आपण किंवा आपल्या मुलांनी किंवा अन्य आप्तीयांनी काही छान केले कि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि तो दुनियेपुढे व्यक्त करण्यासाठी फेसबुक ट्विटर अशी अनेक माध्यमे आता वापरली जातात . बॉलिवुडचा खिलाडी – आणि कायम स्मरणात असलेला बॉलीवूड चा दिवंगत सुपरस्टार राजेश खन्नाचा जावई अक्षय कुमार ने ही असाच आनद व्यक्त केला आहे
अक्षय कुमारचा मुलगा आरव याला कराटे खेळातील ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. आजपर्यंतची सर्वात महान भेट मुलाने दिल्याचे अक्षयने म्हटले आहे.
अक्षयने ट्विटरवर आरवचा फोटो पोस्ट करुन ही बातमी चाहत्यांना कळवली. या फोटोत आरव निळ्या युनिफॉर्ममध्ये ब्लॅक बेल्टसह दिसत आहे.Its a SonDay all d way!After 9 yrs of training my son got his 1st degree black belt in Kudo असे त्याने म्हटले आहे
” आजचा दिवस सर्वार्थाने मुलाचा आहे. माझ्या भावना व्यक्त करताना मी एवढेच म्हणेन, आजपर्यंतची सर्वात महान भेट मला मिळाली आहे,” या शब्दात अक्षयने आपले मन ट्विटरवर मोकळे केले.
” माझा मुलगा चार वर्षाचा असल्यापासून ट्रेनिंग घेत आहे. आणि आज नऊ वर्षे मेहनत करुन त्याने कुडो, ऑकिनावा आणि गोजू रिऊ कराटे डोची ब्लॅक बेल्ट डिग्री मिळवली आहे.”” काही आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, त्यातलाच हा एक आहे. पण तुम्हाला हे कळवताना मला अभिमान वाटत आहे. वडील या नात्याने मला हर्ष झाला आहे,” असेही अक्षयने पुढे लिहिले आहे.