लखीमपूर-लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे उत्तर प्रदेमध्ये आंदोलनांनी वेग पकडला आहे. लखीमपूर खेरीच्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.
सपा प्रमुख अखिलेश यादव लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ आंदोलनासाठी बसले होते. अखिलेश यादव यांना हजरतगंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अखिलेश यादव लखीमपूर खेरीला जात असताना त्यांना यूपी सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.