सांगली: मायक्रोसॉफ्टने यंदाच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे ह्यावर्षी 37 लाख रुपये इतके सर्वाधिक पॅकेज देऊ केले आहे. यंदाच्या कॅम्पस रिक्रुटमेंटमध्ये सहभागी झालेल्या 75 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांनी ह्यावर्षी 7 लाखांहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले आहे आणि 52 कंपन्यांनी वार्षिक 4 लाखांहून अधिक पॅकेज दिले आहे. आतापर्यंत सरासरी 5.07 लाख रुपये वार्षिक पगार देऊ करण्यात आला आहे.
टीसीएस, इन्फोसिस, आयबीएम, कॅपजेमिनी व विप्रो यांनी वालचंद ग्रॅज्युएड्सची मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली, तर मायक्रोसॉफ्ट, डायरेक्ट I, बीपीसीएल, सिमेंटेक, व्हेरिटाज, हिंदुस्तान युनिलिव्हर, बार्कलेज, ईएमसी, सिमेन्स, इटॉन कॉर्पोरेशन, जॉन डीअर, थॉटवर्क्स यांनी उत्तम पगाराची पॅकेज दिली.
आतापर्यंत एकूण 366 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे. त्यापैकी 306 विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट आहेत व 60 पोस्टग्रॅज्युएट आहेत. लोकप्रिय कंपन्यांमध्ये अंदाजे 212 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली. येत्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार आहे, तर काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. याबरोबरच, संस्थेने गेल्या सेमिस्टरमध्ये 107 अंडरग्रॅज्युएट व 93 पोस्टग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली आहे.
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगविषयी
वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची 1947 साली स्थापना झाली आणि भारतातील सर्वात जुनी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. विशेषतः 2007 पासून आपल्या दूरदर्शी अध्यक्ष, श्री अजीत गुलाबचंद आणि प्रशासकीय मंडळाच्या इतर प्रतिष्ठित सदस्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली स्वायत्त संस्थेची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय नव्या रुपाने कार्यंरथ झाले. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये 2018 मध्ये 101-150 च्या रँक बँडमध्ये WCE विशेष टीक्यूआयपीच्या तिस–या टप्प्यात वालचंद कॉलेजची निवड करण्यात आली आहे. त्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जबलपूरचे मार्गदर्शन करणार आहे.