होंडा 2व्हीलर्स इंडियाच्या BS-VI मॉडेलनी ओलांडला 60,000 युनिटचा टप्पा!

Date:

नवी दिल्ली, डिसेंबर 24, 2019: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने पूर्णतः नवी अॅक्टिव्हा 125 BS-VI आणि नवीकोरी 125cc मोटरसायकल SP 125 ही पहिली दोन BS-VI उत्पादने झपाट्याने भारतभर अद्याप उपलब्ध होत असतानाच, त्यांच्या डिस्पॅचचा 60,000 युनिटचा टप्पा विक्रमी वेळेत पार केला असल्याचे आज जाहीर केले आहे.

BS-VI युगामध्ये होंडाची क्वाएट रिव्होल्यूशन सर्व ठिकाणांकडून भरभरून मागणी नोंदवत आहे.

या यशाविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले,

होंडा ब्रँडवर व विशेषतः BS-VI मध्ये परिवर्तन करण्यावर विश्वास ठेवल्याबदद्ल आमच्या ग्राहकांचे आम्ही आभारी आहोत. पहिल्या दोन BS-VI मॉडेलमध्ये (अॅक्टिव्हा 125 BS-VI SP 125) सामाविष्ट केलेल्या होंडाच्या तंत्रज्ञानामुळे एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) व एसीजी स्टार्टर मोटर अशा पेटंट*प्रणित #एक्वाएटरिव्होल्यूशनला चालना मिळाली आहे. या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली आधुनिक वैशिष्ट्ये, मायलेजमध्ये वाढ, टू-व्हीलर उद्योगातील पहिल्या 6 वर्षे वॉरंटीमुळे अत्यंत मनःशांती हा आनंद द्विगुणित करत आहेत**. भारतभर उपलब्धता साध्य करण्याच्या आधीच, BS-VI मार्च 2020 या अंतिम तारखेआधीच तिमाहीपूर्वी 60,000 युनिटचा टप्पा पूर्ण करणे, हे भारतीय ग्राहकांनी होंडावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे.”

 होंडाची #एक्वाएटरिव्होल्यूशन

#एक्वाएटरिव्होल्यूशनचा गाभा होंडाचे पूर्णतः नवे BSVI इंजिन व त्यासोबत असणारे व जगभर नावाजलेले एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान आहे. eSP तंत्रज्ञानामध्ये होंडाचा पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटर (प्रत्येक वेळी झटपट, शांत, हिसके-मुक्त स्टार्ट) व प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (सातत्यपूर्ण पॉवर, कमी एमिशन व अधिक मायलेज यासाठी होंडा इको तंत्रज्ञान), आणि रिड्युस्ड फ्रिक्शनल लॉसेस (सुरळित व उत्तम पॉवर आउटपुटसाठी) एकात्मिक केले आहे.

पूर्णतः नवी अॅक्टिव्हा 125 BSVI

होंडा अॅक्टिव्हा 125 चे डिझाइन व बांधणी परिवर्तनाच्या नव्या युगाच्या अनुषंगाने केलेली आहे. जवळजवळ 26 नव्या पेटंटच्या* मदतीने तयार केलेल्या होंडाच्या विशवासार्ह 125cc PGM-FI HET इंजिनामध्ये eSP तंत्रज्ञानाचा समावेश असून त्यामुळे 13% अधिक मायलेजचे आश्वासन दिले जाते आणि त्यामध्ये या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत – इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, डिजिटल अनालॉग मीटर, इंटिग्रेटेड ज्युएल फंक्शन स्विच व एक्स्टर्नल फ्युएल लिड, इडलिंग स्टॉप सिस्टीम, अतिरिक्त स्टोअरेजसाठी फ्रंट ग्लोव्ह बॉक्स व विशेष 6 वर्षांचे पॅकेज.

अॅक्टिव्हा 125 BSVI 3 प्रकार (स्टँडर्ड / अलॉय / डीलक्स), 4 रंग (रिबेल रेड मेटॅलिक / मिडनाइट ब्लु मेटॅलिक / हेव्ही ग्रे मेटॅलिक / पर्ल प्रेशिअस व्हाइट) यामध्ये उपलब्ध असून, किंमत 67,490 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

 SP125 BSVI – ‘कटाक्षाने केवळ आधुनिक

19 नव्या पेटंटचे पाठबळ असणाऱ्या, होंडाच्या नव्या SP125 ब्रँडने 125cc मोटरसायकल श्रेणीमध्ये दर्जा उंचावला आहे.*

eSP तंत्रज्ञानाचा समावेश असणारे नवे 125cc HET इंजिन 16% अधिक मायलेज देते.

SP 125 ची या श्रेणीतील पहिले सहा तंत्रज्ञान व वैशिष्ट्ये मुळे #एक्वाएटरिव्होल्यूशनला अधिक चालना मिळते आहे – पूर्ण डिजिटल मीटर (डिस्टन्स टू एम्प्टी, सरासरी इंधनक्षमता व रिअल-टाइम इंधनक्षमता अशी रिअल-टाइम आधुनिक माहिती दर्शवणारा), एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट / स्टॉप स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम / पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर. ही सर्व वैशिष्ट्ये व या उद्योगातील पहिले 6 वर्षांच्या वॉरंटीचे पॅकेज.

आधुनिक शैली असलेली SP 125 आक्रमक इंधन टाकी, आकर्षक ग्राफिक, आधुनिक हेडलॅम्प व ठसठशीत रिअर यामुळे इतरांपेक्षा लक्षवेधक दिसती.

 SP 125 2 प्रकार (ड्रम व डिस्क), 4 रंग (स्ट्रायकिंग ग्रीन / मॅट अॅक्सिस मेटॅलिक / इम्परिअल रेड मेटॅलिक / पर्ल सायरन ब्लु) यामध्ये उपलब्ध असून, किंमत 72,900 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे...

धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला

ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत...

अमेरिकेच्या धमकीनंतर 7 देशांचे सैनिक ग्रीनलँडमध्ये पोहोचले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या धमक्यांनंतर...