बेंगळुरू – एमएसएमईला तंत्रज्ञानविषयक सुविधा पुरवणाऱ्या इन्स्टामोजो कंपनीने आज सीसास (कस्टमर सपोर्ट अज अ सर्व्हिस) क्षेत्रातील बेंगळुरूस्थित सायरो या आघाडीच्या कंपनीशी भागिदारी जाहीर केली. या सहकार्यामुळे इन्स्टामोजोला नवे सायरो अप आपल्या एक दशलक्ष व्यापारी वर्गाला उपलब्ध करून देता येणार आहे. नवे सायरो अप फोन, ईमेल, चॅट आणि टिकिटिंग सपोर्टद्वारे 24×7 बहुभाषिक ग्राहक सेवा पुरवते. लाखो एमएसएमईजना ग्राहक सेवा आणि ग्राहक नाते व्यवस्थापन सुधारण्यासाठी मदत करण्याचा हेतू यामागे आहे.
इन्स्टामोजोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह- संस्थापक संपाद स्वेन म्हणाले, ‘ग्राहक हे कोणत्याही व्यवसायाचा गाभा असतात. इन्स्टामोजोसाठी ते एमएसएमई आहेत, तर एमएसएमईजसाठी त्यांचा ग्राहक वर्ग आहे. आम्ही छोट्या व्यवसाय मालकांना आधीपासूनच विविध प्रकारच्या व्यावसायिक सेवा पुरवत असून या अपमुळे त्यांच्या व्यवसायाचे मूल्य आणखी वाढेल. सायरो अपच्या मदतीने इन्स्टामोजो व्यापाऱ्यांना आपल्य ग्राहकांबरोबरचे नाते दृढ करण्यासाठी साधने तसेच व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक ठरू शकणारी ग्राहक वर्तणुकीविषयी अंतर्गत माहिती मिळेल.’
या भागिदारीविषयी सायरोचे संस्थापक राजेश राजू आणि रमाना मूर्ती रेड्डीचार्ला म्हणाले, ‘ग्राहक सेवा हे वेगाने विकसित होत असलेले क्षेत्र असून ईकॉमर्स, फइनटेक, मेडटेक व अशाप्रकारच्या व्यवसायांमुळे त्याला चालना मिळत आहे. ग्राहकांना समाधानी व आनंदी करण्यावर असलेला कंपन्यांचा भर वाढत असल्यामुळे ग्राहकांना येणारा अनुभव हा नक्कीच कंपन्यांना एकमेकांपासून वेगळए ठरवणारा महत्त्वाचा घटक ठरत आहे. ग्राहकांना अतिशय चांगला अनुभव देऊन कंपन्यांना ब्रँडचे मूल्य वाढवता येईल आणि निष्ठावान ग्राहक वर्ग तयार करता येईल. सायरो अपच्या माध्यमातून इन्स्टामोजोच्या व्यापाऱ्यांना ग्राहक समाधानापासून ग्राहक आनंदापर्यंतचा प्रवास सहजपणे पूर्ण करता येईल.’
हे सायरो अप इन्स्टामोजो अप स्टोअरवरून डाउनलोड तसेच सबस्क्राब करता येते. इन्स्टामोजो व्यापाऱ्यांना सायरो अप १५ टक्के सवलतीत उपलब्ध करून दिले जाणार असून निवडलेल्या सेवा पॅकेजनुसार त्यांना १४ दिवसांचा ट्रायल कालावधीही मिळणार आहे.
सायरो अप
सायरो ही कस्टमर सपोर्ट अज अ सर्व्हिस (सीएसएएएस) कंपनी असून ग्राहक सेवेचे काम वाजवी दरातील मासिक नोंदणीसह आउटसोर्स करून फोन, ईमेल, चॅट आणि टिकिटिंग सपोर्टद्वारे 24×7 बहुभाषिक ग्राहक सेवा पुरवण्यासाठी २०१६ मध्ये तिची स्थापना करण्यात आली होती.
इन्स्टामोजोबद्दल
इन्स्टामोजो ही सूक्ष्म, मध्यम आणि लहान उद्योगांसाठीची (एमएसएमई) विकाससेवा पुरवणारी प्लॅटफॉर्म कंपनी असून त्याद्वारे त्यांना आपला व्यवसाय ऑनलाइन पातळीवर उभारण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी सक्षम केले जाते. यामध्ये उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या वैविध्यपूर्ण गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञान, डेटा व डिझाइनसंदर्भातल्या सर्व सेवा एकाच छताखाली पुरवल्या जातात. 2012 मध्ये संपाद स्वेन, आकाश गेहानी आणि आदित्य सेनगुप्ता यांनी स्थापन केलेल्या इन्स्टामोजोला जपानस्थित एनीपे या कंपनीद्वारे प्री- सीरीज बी फंडिंगही मिळाले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये कंपनीने सीरीज ए फंडिंगमध्ये कलारी कॅपिटल ब्लूम व्हेंचर्स, 500 स्टार्ट अप्स आणि इतरांकडून 2.6 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली होती. त्यापूर्वी कंपनीने 500 स्टार्ट अप्स, ब्लूम व्हेंचर्स आणि एंजल गुंतवणूकदार राजन आनंदन, सुनील कालरा, शैलेश राव, रॉब दे ह्यूज व इतरांकडून ५ लाख डॉलर्स उभारले होते. 2012 मध्ये 500 स्टार्ट अप्स सिलिकॉन व्हॅली अक्सलरेटर प्रोग्रॅममध्ये सहभागी झालेल्या पहिल्या काही स्टार्ट अप्समध्ये इन्स्टामोजोचा समावेश होता. 2015 मध्ये कंपनीचा इकॉनॉमिक टाइम्सद्वारे हॉटेस्ट स्टार्ट अप्समध्ये समावेश झाला होता. इन्स्टामोजो सातत्याने डिजिटल कॉमर्स क्षेत्रात जे जागतिक पातळीवर उपलब्ध आहे त्यामध्ये लक्षणीय संशोधनाची निर्मिती करण्यासाठी आणि एमएसएमईसाठी नव्या संधी व शाश्वत अर्थाजन तयार करण्यासाठी काम करत आहे.