होंडा टुव्हीलर्सतर्फे ४० मिलियन विक्रीचा टप्पा पार

Date:

नवी दिल्ली – भारतीय दुचाकी उद्योगक्षेत्रात इतिहास घडवत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीने आज ४० मिलियन दुचाकी विक्रीचा टप्पा पार केला. यामुळे केवळ १८ वर्षांच्या कालावधीत ४० मिलियन युनिट्स विक्रीचा टप्पा गाठणारी होडां ही भारतातील एकमेव दुचाकी कंपनी ठरली आहे.

४० मिलियन ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा होंडाचा प्रवास

होंडाने पहिल्या ११ वर्षांतच पहिले १० मिलियन ग्राहक मिळवले. त्यानंतर तिप्पट वेगाने प्रगती करत कंपनीने पुढील केवळ तीनच वर्षांत आणखी १० मिलियन ग्राहक संपादन केले. १४ वर्षांत २० मिलियन ग्राहक मिळवल्यानंतर आपल्या नेतृत्वाखाली वेगवान प्रगती करणाऱ्या भारताच्या दुचाकी बाजारपेठेत होंडाने चारच वर्षांत २० मिलियन ग्राहक मिळवले.

४० मिलियनचा विक्रमी टप्पा गाठणारी दुचाकी निर्मितीबद्दलचा आपला दृष्टीकोन मांडताना श्री. मिनोरू काटो, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. म्हणाले, ‘इतक्या कमी वेळात ४० मिलियन ग्राहकांनी होंडा ब्रँडवर आपले प्रेम आणि विश्वास व्यक्त केलेला विश्वास आम्हाला सन्माननीय वाचतो. सुरुवातीपासूनच होंडाने दर्जेदार, नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करत लाखो ग्राहकांना आनंद मिळवून देण्यावर भर दिला आहे.’

होंडाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल श्री. यदविंदर सिंग गुलेरिया, वरिष्ठ उपाध्यक्ष – विक्री आणि विपणन, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. म्हणाले, ४० मिलियनपेक्षाही जास्त ग्राहकांना असामान्य सफरीचा आनंद दिल्याचा होंडा टुव्हीलर्स इंडिया प्रा. लि. अभिमान वाटतो. स्कूटर आणि मोटरसायकलची विस्तृत श्रेणी, वेगाने विस्तारणारे नेटवर्क, ग्राहकस्नेही सेवा यांसह होंडा स्वप्नांचा पाठपुरावा करू इच्छिणाऱ्या आपल्या ग्राहकांना याहीपुढे आनंद वाटण्यासाठी सज्ज आहे.

स्वपूर्तीसाठी पायाभरणी करताना

  • २००१ २०११ – होंडाचे पहिले उत्पादन – प्रसिद्ध अक्टिव्हाने होंडाची स्कूटर क्षेत्रात मक्तेदारी स्थापन केली. वेगाने वाढवण्यात आलेली उत्पादनक्षमता आणि १५० सीसी सीबी युनिकॉर्न आणि १२५ सीसी सीबी शाइनसह (आता भारतातील सर्वाधिक विक्री होणारी १२५ सीसी मोटरसायकल) मोटरसायकल क्षेत्रात पर्दापण. २००९ मध्ये इंडस्ट्रीत पहिल्यांदाच – इक्विलायझर तंत्रज्ञानासह कॉम्बी- ब्रेक यंत्रणा, जी दशकभरानंतर सर्वांसाठीच बंधनकारक झाली आहे.

 २०११- २०१८ – २०११ मध्ये एचएमएसआयने भारतीय दुचाकी उद्योगातील एकमेव होंडासह नव्या काळात पर्दापण केले. या सात वर्षांच्या अल्प काळात होंडाने समांतरपणे इंडस्ट्रीत कित्येक नवे मापदंड प्रस्थापित केले.

 एका कारखान्यातून वर्षाला १६ लाख युनिट्सची निर्मिती करण्यापासून चार कारखान्यांतून मिळून वर्षाला ६४ लाख युनिट्सची निर्मिती करण्यापर्यंत, २०१२ मध्ये ड्रीम युगासह सर्वसामान्यांसाठीच्या मोटरसायकल क्षेत्रात पर्दापण करण्यापासून ते भारतातील ग्राहकांच्या गरजेनुसार बाइक्स विकसित करण्याची प्रक्रिया वेगवान व्हावी यासाठी नवे तांत्रिक केंद्र स्थापन करेपर्यंत २०१५ मध्ये सीबीआर ६५० एफ आणि नंतर आफ्रिका ट्विनसह भारतात मोठ्या बाइक्ससाठी मेक इन इंडियाची सुरुवात करण्यापासून आणि नाव्हीसह नव्या प्रकारची राइड विकसित करण्यापासून आणि भारतातील पहिली युटिलिटेरियन स्कूटर क्लिक आणण्यापर्यंत, अक्टिव्हाने भारतातील सर्व दुचाकींना मागे टाकत सर्वाधिक खपाची दुचाकी बनवण्यापासून ते सीबी शाइन मोटरसायकलने ७० लाख विक्रीचा टप्पा पार करेपर्यंत.किंबहुना होंडा दुचाकी इंडियाच्या वेगवान प्रगतीमुळे १२० देशांतील होंडाच्या कामकाजाला चालना मिळत आहे. हे इथेच थांबत नाही, तर लवकरच सहा लाखांच्या अतिरिक्त क्षमतेसह होंडा टुव्हीलर्स इंडियाची एकूण क्षमता २०२० पर्यंत वार्षिक पातळीवर ७० लाख युनिट्सपर्यंत पोहोचणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...