Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आर्म्ड फोर्स्ड मेडिकल कॉलेजमधील चैतन्यमय जोडीने पटकावले टाटा क्रुसिबल कॅम्प्स क्विझ २०१८चे शहर विजेतेपद

Date:

पुणे,: अर्णब सेनगुप्ता आणि अनिरुद्ध अनिल कुमार या आर्म्ड फोर्स्ड मेडिकल कॉलेजमधील जोडीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत टाटा क्रुसिबल कॅम्प्स क्विझ २०१८च्या पुणे आवृत्तीचे विजेतेपद पटकावले

पुण्यातील बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ टेलीकॉम अॅण्ड मॅनेजमेंट अर्थात बीआयटीएममध्ये झालेल्या शहर पातळीवरील अंतिम फेरीमध्ये एकूण १५८ संघ सहभागी झाले होते. अर्णब आणि अनिरुद्ध यांनी विजेत्यांना दिले जाणारे ७५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक प्राप्त केले. हे दोघे राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आता विभागीय फेर्‍यांमध्ये सहभागी होतील. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया अॅण्ड कम्युनिकेशनचे स्टॅनी डेव्हिस आणि विजयदीप शुक्ला हे दोघे उपविजेते ठरले. त्यांना ३५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. श्री. बालाजी सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष तसेच बीआयटीएमचे डीन डॉ. (कर्नल) ए. बालासुब्रमणियन अंतिम फेरीत प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित होते.

टाटा समूहाचे १५०वे वर्ष साजरे करण्यासाठी यंदाच्या प्रश्नमंजूषेचा विषय टाटा समूहाच्या १५० वर्षातील व्यवसायांभोवती फिरणारा होता. या प्रश्नमंजूषेच्या परंपरेप्रमाणे, प्रख्यात क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमणियम यांनी त्यांचे नेहमीचे प्रभुत्व दाखवत, अत्यंत चतुर प्रश्नांना विनोदाची जोड देणार्‍या असाधारण शैलीत प्रश्नमंजूषेचे सूत्रसंचालन सांभाळले.

भारतातील सर्वांत मोठ्या कॅम्पस क्विझचे हे १४वे वर्ष असून ही स्पर्धा दोन महिन्यांहून अधिक काळ, ३८ शहरांमध्ये, पाच विभागीय फेर्‍या आणि त्यानंतर मुंबईत होणारी अंतिम फेरी अशा टप्प्यात होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना ५,००,०००* रोख व सोबतीला प्रतिष्ठेचा टाटा क्रुसिबल चषक असे मोठे बक्षीस दिले जाणार आहे.

या स्पर्धेतील पारितोषिके फास्टट्रॅक आणि टाटा मोटर्स यांनी प्रायोजित केली आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे...

विमान वाहतूक कोसळली: काय म्हणाले मंत्री मोहोळ

इंडिगोने पायलटच्या कामाची वेळ पाळली नाही: ४ सदस्यीय चौकशी...