पुणे-कोंढवा खुर्द (नवीन) हद्द) या भागामधील अनधिकृत बांधकामबाबत पहाणी करुन बांधकामे करणाèया विकसक/मालक यांचेवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ अन्वये गुन्हे दाखल करणेसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत झोन क्र. २ मधील कार्यकारी अभियंता श्री. गंभिरे यांचे नियंत्रणाखाली व संबंधित भागातील इमारत निरीक्षक व उप अभियंता यांचे समन्वयाने कारवाई करणेसाठी २५ कर्मचाèयांची नेमणूक करणेत आली आहे.
त्यानुसार पुणे महानगरपालिकेमार्फत स.नं. ४६ कोंढवा खु. येथे महारष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ व ४३ अन्वये कारवाई करणेत आली. पुणे महानगरपालिकेमार्फत ठाणे अंमलदार कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर यांचेकडे एफ आय आर नोंदवून स.नं. ४६ कोंढवा खु. येथील श्री. उजेर सय्यद, श्री. सरफराज खान, श्री. दादा गायकवाड, श्री. एफ.एफ. पठाण यांचे मिळकतीवर ठाणे प्रभारी अधिकारी श्री. सरदार पांडुरंग पाटील यांचे नियंत्रणाखाली कारवाई करणेत आली.
तसेच झोन क्र. २ धनकवडी येथे विना परवाना बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९६६ कलम ५३ (१) (ए) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत आली.
सदर कारवाई स.नं. ३७ येथील संजय माने यांचे २० चौ. फुट, स.नं. ३० येथील मंदाकिनी अगवणे यांचे ३०० चौ. फुट, अमित काजगर यांचे ३० चौ. फुट असे एकूण ३५० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.