बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Date:

मुंबई, दि. 7: राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणारा आहे. त्यामुळे या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीआज मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपरमुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात यावा. या प्रकल्पाला शासनस्तरावरून आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित मान्यवरांना प्रकल्पाची माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...