स प चीही वाटचाल विद्यापीठाच्या दिशेने….

Date:

पुणे–स.प महाविद्यालयाची वाटचाल सरकारच्या निर्णयानुसार विद्यापठाच्या निर्मितीसाठी व्हर्टिकल क्लस्टर स्वतंत्र महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत.या तिन्ही प्रकारांबाबत शासनाकडून सविस्तर नियमावली अजून प्राप्त झालेली नाही ही नियमावली मिळाली की,त्या नुसार स.पमहाविद्यालयाचे रूपांतर विद्यापठात करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.अशी माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस.के जैन यांनी दिली.

स प महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्रसरकारच्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा)महाविद्यालयास 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.या निधीतून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जैन यांनी दिली. या वेळी श्रीकृष्ण चितळे,प्राचार्य डॉ.दिलीप सेठ उपस्थित होते. जैन यांनी सांगितले की स.पमहाविद्यालयाला स्वययततेचा दर्जा मिळाला आहे.त्याच बरोबर नुकताच रुसाअंतर्गत 5 कोटींचा निधी ही जाहीर झाला आहे.यातून विद्यार्थ्यांनसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचप्रकारे स.प महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापठाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.स प महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहाच्या नूतनकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.सभागृहात अँमफी थिएटर चा लूक देण्यात येईल असे जैन यांनी सांगितले
-पंतप्रधानाच्या हस्ते होणार डिजिटल उदघाटन
-स प महाविद्यालयात येत्या रविवारी(दि.3) दुपारी 3 वाजता पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने -उद्योजकता व कौशल्य कक्षाचे उदघाटन होणार आहे.
-देशभरातील 25 शिक्षणसंस्थांना रुसाअंतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले आहे.या संस्थामध्ये उद्योजकता कक्ष स्थापन करण्यासाठी 50 लाखांचा निधीदेखील देण्यात आला आहे.या कक्षाचे उदघाटन मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
-पंतप्रधान मोदी श्रीनगर येथून या कक्षाचे उदघाटन करतील 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणुकीत लाडक्या बहिणी सूत्रधाराची भूमिका बजावणार

पुणे.दि.१४: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या (१५...

“राणी मुखर्जीच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीला अनिल कपूरचा सलाम”

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांची सहकलाकार आणि जवळची...

अभय योजनेचा शेवटचा दिवस: मतदानामुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

पुणे- मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे....