पुणे- सुप्रसिध्द चित्रकार यशवंत शिरवाडकर यांचे ‘बनारस’ या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन १७ ते ३० मार्च या कालावधीत भोसलेनगर येथील इंडियाआर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संचालक मिलिंद साठे यांनी कळविली आहे.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात बनारस शहराचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्राचीन काळापासून येथे मानवी वस्ती आढळते. भारताची धार्मिक राजधानी म्हणून बनारसची ओळख आहे. हिंदू आणि जैन धर्मीयांसाठी बनारस पवित्र आहे. बौध्द धर्माच्या जडणघडणीत त्याचे योगदान मोलाचे आहे.
गेली तीसहून अधिक वर्षे चित्रकार शिरवाडकर यांचे नाव ‘बनारस’शी जोडले गेले आहे. त्यांनी साकारलेली बनारसच्या घाटांची चित्रे कलाप्रेमींसाठी नेहमीच आकर्षण ठरली आहेत. गंगेच्या काठावर उभ्या असलेल्या इमारतींचे सौंदर्य शिरवाडकर यांच्या चित्रांमधून न्याहाळता येईल. वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना असणार्या या इमारतींची भव्यता आणि नवचैतन्य निर्माण करणार्या पावित्र्याची अनुभूती रसिकांना या चित्रांतून घेता येईल.
यशवंत शिरवाडकर यांनी स्वतःची अशी खास शैली विकसित केली आहेे. कॅनव्हासवर तैलरंगाच्या माध्यमात चाकुच्या (क्निफ) फटकार्यांचा प्रभावी वापर हे त्यांच्या चित्रकलेचे खास वैशिष्ट्य आहे. इंडियाआर्ट गॅलरी, लावण्य, प्लॉट नंबर ३० भोसलेनगर येथे ३० मार्चपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.