भारती विद्यापीठ परिसरातील विश्वराज विहार सोसायटी जवळ बंद पडलेल्या बांधकाम साईटवरील घटना
पुणे -धनकवडीसह दक्षिण उपनगरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या उघड्या टाक्या लहान मुलांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत. तर याच उघड्या टाक्या आता जना वरांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना भारती वि द्यापीठ परिसरात काल शुक्रवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता घडली.पाण्याच्या टाकीत पडले ल्या गायीला तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.भारती विद्यापीठ परिसरातील विश्वराज विहार सोसायटी जवळ खाजगी मालकीच्या बंद पडलेल्या बांधकाम साईटवर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पाण्याच्या उघड्या टाक्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कात्रज अग्निशमन दलासह स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हि गाय या परिसरात फिरत असताना अचानक पाण्याच्या टाकीत पडली. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असलेल्या मजुरांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागितली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवा नांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गाईला वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू केले.टाकी खोल आणि निमुळती असल्यामुळे गाईला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या टाकीचे लोखंडी गज कटरच्या साह्याने कापून गाईला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. गज कापल्यानंतर गाईला बाहेर काढणे सोपे झाले. गाईच्या शिंगाला दोरी बांधून अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत सावधगिरीने या गाईला सुखरुप बाहेर काढले. तब्बल दोन तास अग्निशमन दलाचे हे बचाव कार्य सुरू होते.कात्रज अग्निशमन दलाचे तांडेल महादेव मांगडे, तांडेल आनंददास, चालक गणेश भंडारे, फायरमन विजय स्वामी, प्रसाद कदम, पंकज इंगवले, प्रतिक शिर्के, निलेश तागुंदे, धिरज जगताप, सागर शिर्के, आणि मध्यवर्ती अग्निशमन दलाच्या जवानांनी हे बचाव कार्य केले.

अखेरीस गाईला जिवंत बाहेर काढ ण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश.शहरासह उपनगरांमधील दोन दिवस सुरू असलेल्या पावसात रस्त्यांची चाळण झाल्या ने अनेक अपघात झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. परंतु पाण्याच्या टाक्यीत चक्क गाय पडल्याची धक्कादायक घटना घडली. अग्नी शमन दलाच्या जवानांमुळे गाईला जीवदान मिळाले असले तरी या घटनेमुळे काळजी आणि खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखीत होत आहे. शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी छोटी मोठी गटारं तसेच पा ण्याच्या टाक्यातसेच तुटलेले चेंबर लहानमुलं नागरिक या पाठोपाठ आता जनावरांसाठी ही धोकादायक बनले आहेत त्यामुळेउघड्या टाक्या आणि गटारांवर झाकणे बसवावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

