अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत 3 महिलांसह 16जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप 35 ते 45 भाविक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या घटनेवेळी गुहेजळ तब्बल 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. या ठिकाणी अडकलेल्या भाविकांना सध्या पंचतरणीला हलवण्यात आले आहे. हवाई दलातर्फे या ठिकाणी युद्ध पातळीवर मदत व बचावकार्य राबवण्यात येत आहे. ढगफुटीच्या घटनेनंतर बाधितांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे जवान निलग्रार, बालटाल येथे पोहोचले.मेजर पंकज कुमार, नोडल वैद्यकीय अधिकारी, उत्तर मार्गावरील निर्वासन आणि बचाव कार्य चालू आहे जे ढगफुटीग्रस्त भागात सुरू आहे.
16 मृत्यूची पुष्टी झाली, सुमारे 40 अद्याप बेपत्ता आहेत. दरड कोसळली नाही, पण पाऊस सुरूच आहे, तरीही बचाव कार्यात अडचण नाही. 4 एनडीआरएफ टीम 100 हून अधिक बचावकर्ते बचाव कार्यात आहेत. याशिवाय भारतीय लष्कर, SDRF, CRPF आणि इतर बचावकार्य सुरूच ठेवतात: NDRF DG अतुल करवाल
पवित्र गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात ढगफुटी झाली होती. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि 2 ते 3 लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांना त्याचा फटका बसला. अनेक यात्रेकरू बेपत्ता असून पाण्यासोबत वाहून गेल्याची भीती आहे.
अमरनाथ श्राइन बोर्ड, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस आणि NDRF यांनी हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत
- 0194 2313149
- 0194 2496240
- 9596779039
- 9797796217
- 01936243233
- 01936243018
लष्करासह अनेक यंत्रणा बचावकार्यात
घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या टीमसह आर्मी, आयटीबीपी, सीआरपीएफ, बीएसएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये हलवण्यात येत आहे. जखमींना विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी बचाव मोहिमेची माहिती घेतली
अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश दिले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘मी एलजी मनोज सिन्हाजी यांच्याशी बोललो आहे आणि बाबा अमरनाथजी यांच्या गुहेजवळील ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीची माहिती घेतली आहे. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. मी सर्व भक्तांच्या सुखरुपतेसाठी प्रार्थना करतो.’

