‘टेंडर जगताप ‘ जमिनींना ते चटावलेले- सभागृह नेते गणेश बिडकर यांचा प्रती टोला

Date:

पुणे-शहरातील जमिनींची खडान् खडा माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘टेंडर जगताप ‘ यांना आहे, असे त्यांच्या आजच्या विधानावरून दिसते. जमिनींना ते चटावले आहेत. ही त्यांच्या पक्षाची परंपरा आहे. तीच परंपरा जगताप जोमाने चालवत आहेत, अशा शब्दात महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा समाचार घेतला.
महानगपालिकेच्या ताब्यात असलेल्या ॲमिनिटी स्पेसच्या सर्व जमिनी या २०१७ च्या आधीच्या आहेत. त्यावेळी टेंडर जगताप महापौर होते. या जमिनींची माहिती त्यांनी नीट घेतली असणारच. त्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की, त्यांच्यापासून या सर्व जमिनी भारतीय जनता पक्षाने सुरक्षित ठेवल्या आहेत. पुण्याच्या विकासासाठीच या जमिनी वापरल्या जाणार आहेत, त्यामुळेच चुकीचे आरोप करत जगताप दिशाभूल करत आहेत.
पक्षाने त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मात्र जगताप यांना शहराच्या आणि संघटन वाढीच्या कामात रस नसून महानगरपालिका आणि टेंडर यामध्येच त्यांचा रस आहे. पालिकेच्या कामात त्यांचा वाढत असलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी तसेच नगरसेवक त्रस्त झालेले आहेत. पुणेकरांच्या हितासाठीचे निर्णय घेण्यासाठी विविध समित्यांच्या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद एकमताने पाठिंबा देतात. मात्र टेंडर जगताप याला विरोध करत विकासकामांमध्ये खोडा घालतात. शहर सुधारणा समिती असो अथवा स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीच्या सभासदांनी एकमताने मान्य केलेल्या अनेक विषयांच्या विरोधात जगताप यांनी भूमिका घेतल्याने त्यांच्या या कारभाराला राष्ट्रवादीचे अनेक सभासद कंटाळले असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले.


दिसली मोकळी जमीन की बळकाव, ही प्रवृत्ती पुणेकरांनी खड्यासारखी वेचून बाजूला फेकली. ही प्रवृत्ती पुन्हा जमीनींवर डोळा ठेवून आहे.

  • गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...