‘ॲमेनिटी’च्या विक्रीला दादा पाटलांची ‘स्पेस’- प्रशांत जगताप

Date:

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या मालकीच्या १८५ ॲमेनिटी स्पेस विक्रीला काढल्या असून, त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील ७४ ॲमेनिटी स्पेसचा समावेश आहे. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या होकाराशिवाय किंवा संमतीशिवाय महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी या ॲमेनिटी स्पेस ‘घावूक’ आणि ‘होलसेल’ दराने विक्रीला काढल्या असतील, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे, कोथरूडकरांच्या ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा गोरखधंदा सत्ताधारी भाजपने सुरू केला आहे, यात काही शंका नाही. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन मी करीत आहे.असे प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काढले आहे .

या पत्रकात जगताप यांनी असेही म्हटले आहे कि ,’ कोल्हापुरातून पुण्यात येऊन कोथरूडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी स्वीकारले. त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. परंतु, त्यांचा कोथरूडकरांना काही फायदा होणे तर दूरच, उलट त्यांना निवडून देणे किती त्रासदायक ठरत आहे, हे ॲमेनिटी स्पेस विक्री प्रकरणातून दिसून येत आहे. भाजपने विक्रीस काढलेल्या १८५ पैकी ७४ ॲमेनिटी स्पेस या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कोथरूड, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील आहेत. या ॲमेनिटी स्पेसची विक्री झाल्यानंतर कोथरूडकरांना आरक्षणाच्या जागाच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे, चंद्रकांत पाटील हे ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्या भागातील मोकळ्या जागा म्हणजेच फुफ्फुसच विक्रीला काढल्याची भावना पुणेकर व्यक्त करीत आहेत.

जगताप यांनी या पत्रकात पुढे असेही म्हटले आहे कि,’ भाजपच्या या मनमानी कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून विरोध केला असून, दिवसेंदिवस या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. कोथरूड मतदारसंघातील बहुसंख्य नगरसेवकांनी आणि शहरातील भाजपच्या आणखी काही अशा जवळपास ३० नगरसेवकांनी नुकतीच गुप्त बैठक घेतली. त्यात असंतोषाचा भडका उडाला. त्यानंतर महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बंडाची कल्पना आल्यानंतर मंगळवारची महानगरपालिकेची मुख्य सभा तहकूब करण्यात आली. यावरून, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, हे लक्षात येईल.
चंद्रकांत पाटील यांचे पुण्यात येणे, वावरणे आणि शहराच्या सौंदर्यावर घाला घालण्यासाठी हातभार लावणे किती धोकादायक आहे, हे आता सामान्य पुणेकरांना पटले असेल. ॲमेनिटी स्पेसच्या विक्री प्रकरणात चंद्रकांत पाटील हे लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य पुणेकरांच्या बाजूने आहेत की मनमानी कारभार करणाऱ्या त्यांच्या पक्षाच्याच बाजूने आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन मी करतो.असे जगताप यांनी म्हटले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...