भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांचे निधन

Date:

भारताचे महान धावपटू आणि फ्लाइंग शिख म्हणून ओळखले जाणारे मिल्खासिंग (वय ९१) यांचे येथील एका रुग्णालयात शुक्रवारी रात्री प्राण ज्योत मालवली. कोविड १९ मधून बरे झाल्यानंतरही गेले काही दिवस त्यांच्यावर येथील पीजीआयएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पाच दिवसांपूर्वीच कोविड १९ मुळे त्यांच्या पत्नी निर्मल कौर (वय ८५) यांचे निधन झाले होते. त्यापाठापोठ गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. ते स्वत: आयसीयुमध्ये असल्याने आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारातही ते सहभागी होऊ शकले नव्हते.निर्मल कौर यांच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांचे कुटुंबिय बाहेर आलेले नसतानाच आणखी एक मिल्खा सिंग यांच्या कुटुंबियांना बसला आहे.याबाबत पीजीआयएईआर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मिल्खासिंग यांना ३ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १३ जूनपर्यंत त्यांच्यावर कोरोनाचा उपचार सुरु होता. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करावे लागले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यातून ते बाहेर येऊ शकले नाही. रात्री साडेअकरा वाजता त्यांचे निधन झाले.मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी गोपालपुरा (सध्या पाकिस्तान) येथे झाला. १९५८ आणि १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदाक मिळविणारे ते एकमेव भारतीय धावपटू आहेत. १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये ते ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांचे वैयक्तिक ब्राँझपदक हुकले होते. त्यात त्यांनी ४५.६ सेकंदांची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्यांच्या चरित्रावर २०१३ मध्ये ‘भाग मिल्खा’ हा चित्रपट खूप गाजला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, आम्ही एका महान खेळाडुला गमावले आहे. त त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या ह्दयात वेगळे स्थान निर्माण केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर

राष्ट्रीय कला अकादमी आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थानच्या संयुक्त...

कुपोषणमुक्त मुंबईसाठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा-– पालकमंत्री अँड. आशिष शेलार

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर 2026ज्या पद्धतीने एस.आर..ए ने झोपडपट्टी...

मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवण्याची धमकी:धमकीचा ई-मेल मिळताच यंत्रणा अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी...