आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 48 हजार 497

Date:

पुणे विभागातील 15 लाख 51 हजार 853 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 16 लाख 33 हजार 851 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 14 : पुणे विभागातील 15 लाख 51 हजार 853 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 33 हजार 851 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 48 हजार 497 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 33 हजार 501 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.05 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.98 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 32 हजार 91 रुग्णांपैकी 10 लाख 2 हजार 62 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 682 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 347 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.09 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 80 हजार 607 रुग्णांपैकी 1 लाख 65 हजार 196 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 428 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 983 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 57 हजार 642 रुग्णांपैकी 1 लाख 50 हजार 492 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 885 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 30 हजार 201 रुग्णांपैकी 1 लाख 17 हजार 512 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 951 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 33 हजार 310 रुग्णांपैकी 1 लाख 16 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 551 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 867 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 228, सातारा जिल्ह्यात 856, सोलापूर जिल्ह्यात 385, सांगली जिल्ह्यात 812 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 586 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 6 हजार 68 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 236, सातारा जिल्हयामध्ये 876, सोलापूर जिल्हयामध्ये 507, सांगली जिल्हयामध्ये 878 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 571 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 30 लाख 29 हजार 49, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 98 हजार 520, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 26 हजार 96, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 41 हजार 166 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 7 हजार 428 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 95 लाख 65 हजार 670 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 33 हजार 851 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 13 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर

राष्ट्रीय कला अकादमी आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थानच्या संयुक्त...

कुपोषणमुक्त मुंबईसाठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा-– पालकमंत्री अँड. आशिष शेलार

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर 2026ज्या पद्धतीने एस.आर..ए ने झोपडपट्टी...

मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवण्याची धमकी:धमकीचा ई-मेल मिळताच यंत्रणा अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी...