गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

Date:

बारामती दि. १४ – बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करु नका. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी  ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती  येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. बैठकीला  पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सध्या पुणे जिल्ह्यात तसेच बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. तसेच बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत, यावर  प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनसामुग्रीची  कमतरता भासणार नाही  याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.

यावेळी  जिल्हाधिकारी  डॉ. देशमुख म्हणाले,  पुणे जिल्ह्यात केंद्रीय पथकाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत निरीक्षण केले आहे. पुढचे दोन महिने खूप धोक्याचे आहेत, असा त्यांनी इशारा दिला. त्यांच्या निरीक्षणावरून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामती येथील वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के,  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेते सचिन सातव यांनी बारामती तालुक्यात कोविड नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि अडीअडचणी  सांगितल्या.

पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया म्हणाले,  ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाबाबत दुर्लक्ष होता कामा नये. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्ण (सहव्याधी)  यांना लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा.

बारामती पोलीस वसाहत, नूतन इमारत पायाभरणी समारंभ संपन्न

बारामती येथील पोलीस वसाहत नूतन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि कामांचा तपशील जाणून घेतला.

उपमुख्यमंत्री यांनी केली बारामती तालुक्यातील विकास कामांची पाहणी

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी बारामती तालुका फळ रोपवाटिकेच्या इमारतीचे बांधकाम, रस्त्याचे काम  व परिसर,  गुणवडी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असलेले वसतिगृह व परकाळे बंगला येथील कॅनॉलच्या भिंतीच्या कामाची पाहणी केली.  कामे दर्जेदार आणि वेळेत झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांस दिल्या.

बारामती येथील प्रियांका गवळी यांनी कोविड साठी मदत म्हणून 25 हजार रुपयांचा धनादेश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे  सुपूर्द केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील विहिरींच्या पुनरुज्जीवनाला चालना; प्रतिक कर्पे यांच्या पाठपुराव्याला यश!

प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी ३० लाखांचा प्राथमिक निधी मंजूर; महापौर...

‘क्लिपमधील संभाषण म्हणजे लोकशाहीचा खून आणि बलात्कारच!’; राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात

‘५०० कोटींचा खुलासा झालाच पाहिजे; पण माध्यमांवरील दडपशाही आणि...

धरणांत गेल्या वर्षापेक्षा ३.६५ टीएमसी कमी पाणी; मुंढवा जॅकवेलचा पुरेपूर वापर आधीच का झाला नाही?

पुणेकरांवर पाणीकपात, शेतीसाठी धरणातून आवर्तन; विवेक वेलणकरांच्या पाठपुराव्यानंतर जॅकवेलमधील...

‘५०० कोटींच्या विषयावर ED-CBI आता झोपली आहे का?’; संजय राऊतांचा सरकारला सवाल!

जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवरून भाजपसह शिंदे गटावर निशाणा मुंबई |...