आदित्य रॉय कपूर बनला आपली स्वत:ची ‘3डी बोलकी बाहुली’ असलेला बॉलीवूडचा पहिला अभिनेता !

Date:

फिल्ममेकर अनुराग बासुच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या ‘लूडो’ ह्या चित्रपटाची सध्या सर्वत्र वाखाणणी होत आहे. ह्या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूरला शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांची कला अवगत असते. ह्या सिनेमात आदित्यची ‘ऑल्टर इगो’  दाखवण्यात  आलेली त्याच्यासारखी हुबेहुब दिसणारी बाहुली सुप्रसिध्द शब्दभ्रमकार रामदास पाध्ये आणि त्यांचा मुलगा सत्यजीत पाध्ये ह्यांनी बनवली आहे. 3डी प्रींटिंग प्रणालीचा उपयोग करून त्यांनी आदित्यसाराखी दिसणारी बाहुली बनवलीय. आदित्य रॉय कपूर  आपली स्वत:ची अशा पध्दतीच 3डी बाहुली असलेला पहिला अभिनेता बनला आहे.

ह्याविषयी अधिक माहिती देताना शब्दभ्रमकार रामदास पाध्ये म्हणतात, “अनुराग बासु ह्यांना आम्ही हुबेहुब दिसणा-या बाहुल्या बनवू शकतो,ह्याविषयी माहिती होती. ते आमच्याकडे आले असता, आम्ही काही संग्रही असलेल्या बाहुल्या दाखवल्या. तेव्हा त्यातले बारकावे पाहून ते चकित झाले होते.”

शब्दभ्रम आणि बोलक्या बाहुल्यांच्या कलेत 53 वर्षांचा गाढा अनुभव असलेल्या रामदास पाध्येंच्या संग्रही 2200 पेक्षा जास्त बाहुल्या आहेत. वडिलांप्रमाणेच ह्या क्षेत्रात नाव कमावलेले सत्यजित पाध्ये तर इंडियाज गॉट टैंलेंट, ‘केबीसी’, ‘बिग बॉस’ अशा लोकप्रिय शो मध्येही दिसले आहेत.

सत्यजीत सांगतात, “आदित्यची 3डी बाहुली बनवताना आम्ही त्याचा 3 डी स्कॅन केरून घेतला. त्यानंतर आदित्यचे काही 3 डी फोटो काढले. आणि मग त्यानूसार, आम्ही फायनल 3डी प्रीटेंड बाहुली तयार केली. आदित्यच्या ह्या बाहुलीचं वैशिष्ठ्य ठेवायचं होतं, त्याची हेयरस्टाइल आणि त्याच्या चेह-यावरचं लांबसडक नाक. “

ही बाहुली बनवल्यावर पुढे होता सर्वात कठीण भाग. तोंडाची ठेवण, भुवया, आणि पापण्या ह्यांची हालचाल करायची होती. मग इथे रामदास पाध्ये ह्यांचा प्रगाढ अनुभव कामी आला. ह्यानंतर आदित्यला सत्यजीतने ट्रेनिंग दिले.

ट्रेनिंगच्या अनुभवाविषयी सत्यजित सांगतात, “आदित्यच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तो मन लावून ही कला आत्मसात करण्यामध्ये लक्ष द्यायचा. मी त्याच्या घरी त्याला शिकवायला जायचो. शब्दभ्रमकार बनण्याचे तंत्रशुध्द शिक्षण आदित्यने खूप लवकर शिकले. शुटिंगच्या दरम्यान मदतीसाठी मी उपस्थित होतो. पण मला सांगायला आनंद वाटतो, की, आदित्यने अनेक बारकाव्यांसह ही भूमिका चांगली वठवलीय. “

आदित्य रॉय कपूरने सत्यजीतला फिल्मनंतर मेसेज करत त्याचे आभार मानले आहेत. आदित्यने म्हटलंय, “ह्या चित्रपटातल्या माझ्या भुमिकेच्या तयारीसाठी आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्याकडून ही सुंदर कला शिकणे हा एक अद्भुत अनुभव होता. आपल्या वडिलांना (रामदास पाध्ये) ह्यांनाही माझा परफॉर्मन्स आवडेल अशी आशा आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुपोषणमुक्त मुंबईसाठी एसआरएने स्वतंत्र कार्यक्रम हाती घ्यावा-– पालकमंत्री अँड. आशिष शेलार

मुंबई, दि. 12 नोव्हेंबर 2026ज्या पद्धतीने एस.आर..ए ने झोपडपट्टी...

मुंबईनंतर पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवण्याची धमकी:धमकीचा ई-मेल मिळताच यंत्रणा अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

पुणे- महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी...

HCMTR आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे निर्देश.

खासगी जागांची मोजणी व संयुक्त मोजणीची कार्यवाही पुढील शुक्रवार...